Home /News /crime /

फसवणूक करत तरुणीने केली तब्बल 30 लग्न, पण 31व्या लग्नात पकडली गेली आणि...असा रचला सापळा

फसवणूक करत तरुणीने केली तब्बल 30 लग्न, पण 31व्या लग्नात पकडली गेली आणि...असा रचला सापळा

राजस्थानमध्ये (Rajasthan) एका तरुणीने तब्बल 30 जणांसोबत लग्न करुन त्यांना मूर्ख बनविले आहे. 31वे लग्न (Marriage) करताना हा फसवणूकीचा (Fraud) प्रकार समोर आला आहे.

    डूंगरपुर, 13 मे : राजस्थानमध्ये (Rajasthan) एका तरुणीने तब्बल 30 जणांसोबत लग्न करुन त्यांना मूर्ख बनविले आहे. 31वे लग्न (Marriage) करताना हा फसवणूकीचा (Fraud) प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिला डुंगरपूर जिल्ह्यातील सागवाडा पोलिसांनी अटक केली आहे. रीना असे आरोपी मुलीचे नाव आहे. तिला जबलपूर येथून अटक करण्यात आली. रीना एका वर्षाआधी लग्नाच्या नावावर 5 लाख रुपये घेऊन पळाली होती. याचप्रकरणी तिला अटक करण्यात आली. यानंतर चौकशीत तिने 30 लग्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिचे खरे नाव सीता चौधरी असे आहे. लग्नानंतर फक्त 7 दिवस राहिली सासरी -  सागवाडा पोलीस निरीक्षक सुरेंद्र सिंह सोलंकी यांनी सांगितले की, 12 डिसेंबर 2021 ला जोधपुरा येथील रहिवासी प्रकाशचंद्र भट्ट यांनी एक तक्रार दाखल केली होती. भट्ट यांनी सांगितले की, जुलै 2021 मध्ये एजंट परेश जैन याने मध्यप्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी रीना ठाकुर सोबत त्याचे लग्न लावून दिले होते. याबदल्यात रमेश आणि रीनाने त्याच्याकडून 5 लाख रुपये घेतले होते. यानंतर लग्नानंतर 7 दिवस सासरी राहिल्यानंतर रीना त्याच्यासोबत जबलपूर येथे गेली. परत येताना रीनाने दुसऱ्या लोकांना सोबत घेऊन त्याला मारहाणही केली आणि आपल्या साथीदारांसह ती पळून गेली. यानंतर परेश जैन आणि रीनाने आपले फोन नंबरही बदलले तसेच त्याचे पैसेदेखील दिले नाही. पोलीस तपासादरम्यान असे आढळून आले की, रीना ठाकूरचे खरे नाव सीता चौधरी आहे. ती जबलपूर येथे गुड्डी उर्फ पूजा बर्मनच्या सोबत काम करते. गुड्डीने लुटारू नववधूंची टोळी चालवली आहे. तिने काही मुलींची बनावट नावं, पत्त्यासह आधारकार्ड आणि अन्य कागदपत्र तयार करुन ठेवले आहे. अनेक राज्यांमध्ये ती एजंटच्या माध्यमातून बनावट लग्न करवून त्यांच्यापासून पैसे आणि सोने, चांदीचे दागिने घेत होती. त्यानंतर ती फरार होत होती. सीता चौधरीदेखील अधिक काळापासून तिच्यासोबत राहत होती. पोलिसांनी रचला असा सापळा - पोलिसांनी तपासादरम्यान, पूजा बर्मनचा नंबर काढला. यानंतर कॉन्स्टेबल भानुप्रतापने आपला फोटो पाठवून लग्न करण्याबाबत तिला सांगितले. लग्नासाठी मुलगी दाखवायला पाच हजार रुपये मागण्यात आले. त्यानंतर पूजाने कॉन्स्टेबलला 8 ते 10 मुलींचे फोटो पाठवले. त्यात रीनाचाही फोटोही होता. पोलिसांनी रीनाला लगेचच ओळखले. यानंतर एक सापळा रचत रीना पसंत असल्याचे सांगत तिच्यासोबत लग्न करण्याचे सांगितले. हेही वाचा - विधवा सांगून केले लग्न, आठवड्याभरातच पैसे आणि दागिने घेऊन तरुणी फरार पूजाने कॉन्स्टेबलला समदडिया मॉलजवळ अॅडव्हान्स मध्ये 50 हजार रुपये घेण्याबाबत सांगितले. यानंतर कॉन्स्टेबल भानुप्रताप वर बनला आणि त्याच्यासोबत कॉन्स्टेबल भूपेंद्र सिंह आणि वीरेंद्र सिंह त्याचे मित्र बनून गेले. तिकडे पूजा रीना ठाकूरला घेऊन आली. तिथे तिने तिचे नाव काजल चौधरी असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांना इशारा मिळताच महिला पोलीस पथकही तिथे पोहोचले. यानंतर पोलिसांनी रीना चौधरी उर्फ सीता चौधरी उर्फ काजल चौधरी हिला अटक केली. आतापर्यंत तिने 30 लग्न केल्याचे सांगितले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Marriage, Police arrest, Rajasthan

    पुढील बातम्या