मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

4 कोटींच्या रोकडसह पळवून नेलेली एटीएम व्हॅन अखेर सापडली, पण...

4 कोटींच्या रोकडसह पळवून नेलेली एटीएम व्हॅन अखेर सापडली, पण...

नेहमीप्रमाणे  कोटक महिंद्रा बँकेत पैसे भरण्यासाठी व्हॅन आली होती. पण, गाडीतून मॅनेजर आणि बॉडीगार्ड खाली उतरले आणि...

नेहमीप्रमाणे कोटक महिंद्रा बँकेत पैसे भरण्यासाठी व्हॅन आली होती. पण, गाडीतून मॅनेजर आणि बॉडीगार्ड खाली उतरले आणि...

नेहमीप्रमाणे कोटक महिंद्रा बँकेत पैसे भरण्यासाठी व्हॅन आली होती. पण, गाडीतून मॅनेजर आणि बॉडीगार्ड खाली उतरले आणि...

  • Published by:  sachin Salve
विरार, 13 नोव्हेंबर : मुंबई (Mumbai )जवळील विरारमध्ये बोळींज (virar bolinj) भागात कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये (ATM Van) पैसे भरण्यासाठी आलेली गाडी चालकानेच पळवून नेल्याची घटना गुरुवारी घडली होती. अखेर ही व्हॅन भिवंडी परिसरात एका निर्जनस्थळी आढळून आली आहे. मात्र, गाडीतून 4 कोटींची रक्कम लंपास करण्यात आली आहे. विरार पश्चिमेकडील बोळींज भागात गुरुवारी 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. नेहमीप्रमाणे  कोटक महिंद्रा बँकेत पैसे भरण्यासाठी व्हॅन आली होती. पण, गाडीतून मॅनेजर आणि बॉडीगार्ड खाली उतरले. दोघेही जण खाली उतरल्याची संधी साधून चालकाने व्हॅन सुसाट पळवली. बॉडीगार्ड आणि मॅनेजरने जोरात आरडाओरडा केला. पण, चालकाने वेगाने निघून गेला होता. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल मॅनेजरने आपल्या बँक व्यवस्थपकाला याची माहिती दिली. बँकेनं तातडीने याबद्दल विरार पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने मुंबई अहमदाबाद महामार्गावर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर   नाकाबंदी केली होती. उशिरा हा होईना शहाणपण सुचले, भाजपचा ठाकरे सरकारला टोला दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, तपास सुरू असताना भिवंडी एका निर्जनस्थळी व्हॅन एमएच 43 बीपी 4976 आढळून आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर व्हॅनची पाहणी केली. पण, व्हॅनमध्ये चोरीला गेलेली 4 कोटींची रक्कम आढळून आली नाही. चालकाने 4 कोटी 58 लाखांची रक्कम घेऊन पसार झाला होता. रायडर नावाच्या कंपनीला व्हॅनचे कंत्राट देण्यात आले होते. या व्हॅनचालकाचा घरचा पत्ता सापडला आहे. Online Class साठी घेतला नवीन मोबाइल; महिनाभरात स्वत:ला पेटवून घेण्याची आली वेळ या व्हॅनच्या शोधासाठी तीन पथक तयार करण्यात आली  आहे. या प्रकरणाचा वसई विरार पोलिसांसकडून कसून तपास सुरू आहे, अशी माहिती  पोलीस उपायुक्त  संजयकुमार पाटील यांनी दिली.
First published:

पुढील बातम्या