Home /News /crime /

आधी मोबाइलवर स्टेटस ठेवलं, मग गाणी लावली; हळू हळू तरुणाने स्वत:चाच केला अंत

आधी मोबाइलवर स्टेटस ठेवलं, मग गाणी लावली; हळू हळू तरुणाने स्वत:चाच केला अंत

तरुणाने स्टेटसमध्ये त्याची घालमेल लिहिली होती, पुन्हा त्याने स्टेटस अपडेट केलं आणि...

    कोटा, 11 डिसेंबर : राजस्थानमधील (Rajasthan News) कोटातील रामगंजमंडी पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात तरुणाने स्वत:च्या घरात गळफास घेऊ आत्महत्या केली. यावेळी तरुण घरी एकटाच होता. यापूर्वी तरुणाने आपल्या मोबाइलवर स्टेटस लिहिलं होतं, आता जगायची इच्छा नाही..यानंतर स्टेटस (Mobile Status) अपडेट केलं आणि त्यावेळी लिहिलं की. हा शेवटचा स्टेटस...आणि काही वेळाने सुसाइड (Suicide) केलं. कुटुंबीय घरी परतले तेव्हा तरुणाच्या खोलीत गाणी सुरू होती. आणि तरुण पंख्याला लटकत होता. यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत नंदकिशोर धाकड (21) उंडवा गावातील रहिवासी होता. त्याचं दहावीपर्यंत शिक्षण झालं होतं. गेल्या चार महिन्यांपासून तो बाइकच्या शोरूममध्ये काम करीत होता. शुक्रवारी त्याचे आई-वडील आणि बहिण कामावर गेले होते. झोपायचं कारण सांगून तो शेतावर गेला नाही. हे ही वाचा-पुण्यातून नोकरीसाठी जर्मनीत शिफ्ट झालं दाम्पत्य; पतीच्या अत्याचाराने ती हादरली! कुटुंबीय सायंकाळी 6 वाजता घरी परतले तर त्यांनी पाहिलं की, मोबाइलवर गाणी सुरू होती. खोलीचा गेट आतून बंद होता. खोलीचा गेट उघडला नाही म्हणून गच्चीवर जाऊन पाहिलं तर नंदकिशोर गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत होता. नंदकिशोरने दुपारीच गळफास घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण 3 ते 4 तासांपासून शेजारच्यांनी गाण्याचा आवाज येत असल्याचं त्यांनी सांगितलं. अद्याप कारण कळलं नाही... मृत तरुणाच्या जवळ सुसाइड नोट सापडलेली नाही. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, नंदकिशोर नोकरीतून मिळालेले पैसे घरात देत नव्हता. सर्व पैसे तो स्वत:च खर्च करीत होता. यावरुन वारंवार त्याचे घरच्यांसोबत खटके उडत होते. त्याच्या वडिलांवर कर्ज होतं. पोलिसांनी सांगितलं की, सुसाइड करण्यासाठी तरुणाने सोशल मीडियावर स्टेटस अपलोड केलं. पोलिसांकडून कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या