7 वर्ष 182 तरुणींसोबत संभोग करून तयार केले MMS, बड्या उद्योगतींच्या दोन मुलांना अटक

7 वर्ष 182 तरुणींसोबत संभोग करून तयार केले MMS, बड्या उद्योगतींच्या दोन मुलांना अटक

देशातलं सर्वात मोठे ब्लॅकमेल रॅकेट, उद्योगतींच्या मुलांनी तयार केले महिलांचे 182 Sex क्लिप

  • Share this:

कोलकाता, 30 जानेवारी : भारतात रोज सेक्स रॅकेटच्या बातम्या येत असताता. मात्र यात कधी मोठ्या घरातल्या मुलांची नावे समोर येत नाही. मात्र कोलाकातमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बुधवारी दोन उद्योगपतींच्या मुलांना सेक्स ब्लॅकमेल रॅकेट चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या दोघांवर महिलांसोबत संबंध ठेवून त्याच्या सेक्स क्लिप बनवल्याचा आरोप आहे. या सगळ्यात या दोन्ही मुलांच्या घरातील सामिल असलेल्या नोकरांनाही अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत, गेल्या अनेक वर्षांपासून ही दोन मुलं हा रॅकेट चालवत आहेत. त्याच्यांकडे 182 महिलांच्या सेक्स क्लिप आहेत. तीन महिने केलेल्या तपासानंतर पोलिसांनी आदित्य अग्रवाल आणि अनीश लोहारूका यांना अटक केली आहे. दोघांचे वय 20 वर्ष असून त्यांना मदत करणाऱ्या कैलाश यादव नावाच्या नोकरालाही अटक करण्यात आली आहे.

वाचा-देश तोडायला निघालेला प्रेयसीमुळे पोलिसांच्या ताब्यात, शरजील इमामची INSIDE स्टोरी

दोन मोठ्या उद्योगपतींच्या मुलांचे रॅकेट

आदित्य अग्रवाल हा कोलाकातामधील सर्वात मोठे कपड्यांचे दुकान असलेल्या घरातील आहे. तर, अनीश लोहारूका याचे वडिल रिअल इस्टेट आणि हॉटेल चालवतात. तिन्ही आरोपींना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. लोहारूका परिवारातील एका व्यक्तीने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अनीशला या सगळ्यात फसवले गेल्याचे सांगितले. तर, एका महिलेने या दोघांवर 10 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे.

वाचा-सिझेरियन नको, नॉर्मल डिलिव्हरी हवी; मग गरोदरपणात घ्या 'ही' काळजी

लॅपटॉपमध्ये सापडल्या 182 सेक्स क्लिप

पोलीसांनी अनिशचा लॅपटॉप जप्त केल्यानंतर त्यात 182 सेक्स क्लिपचे फोल्डर आढळून आले. प्रत्येक फोल्डरमध्ये महिलेचे नाव लिहिण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यात 2013पासूनचे क्लिप आहेत. सध्या लॅपटॉपला फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे.

वाचा-पाळीव कुत्र्याने चिमुरड्याचा पकडला पाय, जमावाने काठी दगडांने बेदम मारलं पण..

महिलांशी मैत्री करून करत होते सेक्स

या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी दोन मुख्य आरोपींनी महिलांशी मैत्री करत त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवल्याचे कबुल केले. आदित्या आणि अनीश वेगवेगळ्या महिलांसोबत मैत्री करत त्यानंतर त्यांना आपल्या घरी किंवा हॉटेलवर भेटायला बोलवत. तेथेच कॅमेरा लपवून या महिलांसोबत शारिरीक संबंध ठेवल्याचे त्यांनी मान्य केले. त्यानंतर रेकॉर्ड केलेले हे व्हिडीओ आपल्या लॅपटॉपमध्ये ठेवत. काही दिवसांनंतर हेच व्हिडीओ दाखवून महिलांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैसे उकळत असत. या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर पोलीस यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे.

First published: January 30, 2020, 2:05 PM IST
Tags: Sex racket

ताज्या बातम्या