मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सोंग पडलं महागात! नकली किन्नर मागत होते भीक, खऱ्या किन्नरांनी 'अशी' काढली धिंड

सोंग पडलं महागात! नकली किन्नर मागत होते भीक, खऱ्या किन्नरांनी 'अशी' काढली धिंड

किन्नर असल्याचं सोंग घेऊन भीक मागणाऱ्या काही (Kinner made 4 youth naked  and roamed in the city) रुणांचा खऱ्या किन्नरांनी पर्दाफाश करत त्यांना चांगलीच अद्दल घडवली.

  • Published by:  desk news

जोधपूर, 6 ऑक्टोबर : किन्नर असल्याचं सोंग घेऊन भीक मागणाऱ्या काही (Kinner made 4 youth naked  and roamed in the city) रुणांचा खऱ्या किन्नरांनी पर्दाफाश करत त्यांना चांगलीच अद्दल घडवली. किन्नर बनून भीक मागितली (youth begging as kinner) की अधिक पैसे मिळतात, असा अनुभव असल्यामुळे या तरुणांनी किन्नरासारखी वेशभूषा करून भीक मागण्याचा प्रकार सुरु केला होता. मात्र खऱ्या किन्नरांना जेव्हा ही बाब समजली, तेव्हा त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली.

नागरिकांनी दिली सूचना

राजस्थानातील सनसिटी जोधपूरमध्ये काही तरूण हे किन्नर बनून भीक मागत होते. हे तरुण खरे किन्नर नसल्याचा संशय एका नागरिकाला आला. त्याने खऱ्या किन्नराला फोन करून आपली शंका सांगितली. त्यानंतर खरे किन्नर मोठ्या संख्येनं घटनास्थळी दाखल झाले. त्यांना पाहून नकली किन्नर चांगलेच घाबरले आणि तिथून काढता पाय घेऊ लागले. मात्र या प्रकारामुळे संतापलेल्या किन्नरांनी तरुणांना चांगलीच अद्दल शिकवायचं ठरवलं.

तरुणांची काढली धिंड

किन्नरांनी या तरुणांना भर रस्त्यात निर्वस्त्र केलं. त्यांच्या डोक्यावर ढोल दिला आणि रस्त्यातून त्यांची धिंड  काढायला सुरुवात केली. स्वतः किन्नरदेखील या धिंडीत सहभागी झाले. किन्नरांनी निर्वस्त्र अवस्थेतच या तरुणांना आसपासच्या सुमारे 2.5 किलोमीटर परिसरात फिरवलं. हा अश्लील प्रकार पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. शहरात पहिल्यांदाच असा प्रकार घडत असल्यामुळे अनेकांना नेमकं काय चाललंय, याची कल्पनाही येत नव्हती. मात्र आपल्या नावाने भीक मागणाऱ्या तरुणांना चांगलीच अद्दल घडवण्यासाठी किन्नर इरेला पेटले होते.

हे वाचा - लेकाच्या सुखासाठी सुनेसह चौघांची हत्या; प्रकरण उलटल्याने स्वत:लाच दिली शिक्षा

पोलीस तपास सुरू

रस्त्यातील अनेक नागरिकांनी या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि बघता बघता ते व्हायरल झाले. पोलिसांपर्यंतदेखील हे फुटेज पोहोचलं आणि त्यांनी तपास करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे शहरात भर रस्त्यावर, शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला, तरी पोलिसांना त्याची काहीही कल्पना नव्हती. व्हॉट्सअपवरून व्हिडिओ पाहिल्यानंतरच पोलिसांना घडलेली घटना समजली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime, Rajasthan