मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

लेकाच्या सुखासाठी सुनेसह चौघांची हत्या; मात्र प्रकरण उलटल्याने सासऱ्याचं भयावह कृत्य

लेकाच्या सुखासाठी सुनेसह चौघांची हत्या; मात्र प्रकरण उलटल्याने सासऱ्याचं भयावह कृत्य

लेकाच्या सुखासाठी निवृत्त आर्मी अधिकारी असलेल्या बापाने चौघांची हत्या केली. मात्र शेवटी प्रकरण त्याच्याच अंगाशी आलं.

लेकाच्या सुखासाठी निवृत्त आर्मी अधिकारी असलेल्या बापाने चौघांची हत्या केली. मात्र शेवटी प्रकरण त्याच्याच अंगाशी आलं.

लेकाच्या सुखासाठी निवृत्त आर्मी अधिकारी असलेल्या बापाने चौघांची हत्या केली. मात्र शेवटी प्रकरण त्याच्याच अंगाशी आलं.

  • Published by:  Meenal Gangurde

गुडगाव, 6 ऑक्टोबर : गुरुग्राम येथील (gurugram murder cases) राजेंद्र पार्क भागात 4 हत्याकांडातील मुख्य आरोपी निवृत्त फौजी (Indian army) राव राय सिंहने भोंडसी तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Jail) केल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी 6 च्या वेळेत कैद्यांची हजेरी सुरू होती, यादरम्यान कैदी राव सिंह याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

नोटबुकमध्ये लिहिल्या होत्या धक्कादायक गोष्टी...

सुरुवातील तुरुंगातील स्टाफ (Jail Staff) कैद्यांची मोजणी करीत होता. यावेळी राव सिंह हा त्याच्या बॅरेकमध्ये सापडला नाही. त्याचा शोध घेतला तेव्हा त्याने लोखंडाच्या ग्रीनच्या साहाय्याने आत्महत्या केल्याचं दिसून आलं. डॉक्टरांना बोलावून त्याची तपासणी करण्यात आली तेव्हा आरोपी कैद्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. यानंतर तपास सुरू झाला. कैद्याने नोटबुकमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. (Killing of four including daughter in law for sons happiness Committed suicide in prison)

काय होता आरोप

मृतक कैदीने 23 ऑगस्टच्या रात्री राजेंद्र पार्क भागातील आपल्या घरातील सदस्यांवर हल्ला केला होता. त्याने सून सुनीता यादव, भाडेकरू कृष्ण कुमार तिवारी, कृष्ण याची पत्नी अनामिका , भाडेकरूच्या मुली सुरभी आणि विधी (prisoner killed four people, including Daughter-in-law) यांच्यावर हल्ला केला होता. यात विधी हिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात आलं. यात बाकी चौघांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपी स्वत:चा हत्यार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला होता.

या प्रकरणात केलं होतं एसआयटीचं गठण

या प्रकरणात राव राय सिंह याच्या शिवाय त्याची पत्नीलाही अटक झाली होती. आरोपी सूने व भाडेकरूच्या नातेवाईकांनी मात्र या प्रकरणात सीबीआयची मागणी केली होती. कैदीच्या डायरीतून धक्कादायक माहिती उघड झाल्याचं सांगितलं जात आहे. भोंडसी जेलमध्ये गळफास घेतल्यानंतर राय सिंह याच्या मृत्यूच्या कारणांवर तपास केला जात आहे.

हे ही वाचा-हायप्रोफाईल व्यापाऱ्याने केली आत्महत्या, पत्नीने कापून घेतला स्वतःचा गळा

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीतील सूत्रांनी सांगितलं की, आरोपी सुरुवातीपासून हत्याकांडाला आपला गुन्हा मानून प्रायश्चित्त करू इच्छित होता. तो म्हणत असे की कोर्टात मी कबुल करीन की हत्या मीच केल्या आहेत. यानंतर कोर्टाने फाशी दिली तरी मला कबुल आहे. या प्रकरणात तुरुंगातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपी तुरुंगात खूप शांत राहत होता. कोणाशीही जास्त बोलत नसे. तो आपल्या मुलाबाबत खूप चिंतित होता. त्याच्या मुलाला या प्रकरणात दोषी मानत असल्यामुळे आरोपी दुखी होता. मात्र मुलाचा यात काहीही दोष नसल्याचं तो सांगत असे.

काय आहे प्रकरण..

सूनेचे भाडेकरूसोबत विवाह बाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन सासऱ्याने सूनेची हत्या केली. इतकच नाही तर त्याने भाडेकरूसह त्याची पत्नी आणि दोन मुलींवरही शस्त्राने हल्ला केला होता.

First published:

Tags: Daughter, Indian army, Murder, Punjab