Home /News /crime /

नांदेडमध्ये सिनेस्टाइल थरार, मुलाला घेऊन पळत होता गुंड पोलिसांनी पाठलाग केली आणि...

नांदेडमध्ये सिनेस्टाइल थरार, मुलाला घेऊन पळत होता गुंड पोलिसांनी पाठलाग केली आणि...

ही घटना शहरातील निळा रस्त्यावर असलेल्या महादेवनगर परिसरात संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली.

नांदेड, 08 ऑगस्ट : नांदेड शहरात एका अट्टल गुन्हेगाराने एका अपहरण केलेल्या 14 वर्षीय मुलाची सिनेस्टाइल सुटका केल्याची थरारक घटना घडली आहे. पोलिसांनी पाठलाग करून या गुन्हेगाराच्या तावडीतून या मुलाची सुखरुप सुटका केली. अपहरणकर्त्या गुन्हेगारांने तब्बल 20 लाखांची खंडणी मागितली होती. ही घटना शहरातील निळा रस्त्यावर असलेल्या महादेवनगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहाच्या  सुमारास घडली. लोहा परिसरात राहणाऱ्या गिरी कुटुंबातील 14 वर्षीय शुभम गिरी या मुलाची आरोपी विकास हटकर याने संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास अपहरण केले होते. त्यानंतर त्याने मुलाची आई जनाबाई यांना फोन करून 20   लाखांची खंडणी मागितली होती. पैसे दिले नाहीतर मुलाला ठार मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे घाबरलेल्या गिरी कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. लोहा पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल त्यांनी तक्रार दाखल केली. परिस्थितीचे गांभीर्य पाहात पोलिसांनी तातडीने पावलं उचलली. कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 दिवसांत होणार निर्णय पोलीस चौकशीतून अट्टल गुन्हेगार विकास हटकर यानेच मुलाचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आलेल्या फोनवरुन मोबाइल सीआरडीवरून आरोपीच्या ठिकाणाचा शोध घेतला. त्यावरुन विकास हटकर निळा रोड परिसरात एका घरात लपला असल्याचे कळले. त्यानंतर खबऱ्याच्या मार्फत विकास हटकरची माहितीही मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण पोलीस आपल्या मागावर आल्याची कुणकुण लागताच विकास हटकरने मुलाला घेऊन पुयनी मार्गे मार्ग पळत होता, पोलिसांनी त्याला थांबण्याचे आवाहन केले. मात्र, तो थांबला नाही. पोलिसांनी पाठलाग करत शेवटी विकासच्या पायावर गोळी झाडली आणि यात जागेवरच कोसळला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मुलाची सुखरूप सुटका करुन कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले. विकास हटकर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खंडणी, लुटमार, चोरी, खूनाचा प्रयत्न असे अनेक गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे.  पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Crime, Nanded, नांदेड

पुढील बातम्या