उज्जैन, 1 एप्रिल : गुरुवारी उज्जैनमधील (Madhya Pradesh News) जीवाजीगंज पोलीस ठाणे हद्दीतील देवास येथील एक तरुण आपल्या पत्नीचं अपहरण करून पळवून घेऊन गेला. तरुण आपल्या काही मित्रांसह तलवार घेऊन आला होता, आणि आपल्या पत्नीला पळवून घेऊन गेला. यादरम्यान सासरच्यांसोबत मारहाणही झाली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुणावर आपल्याच पत्नीचं अपहरण करण्याची वेळ का आली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
देवासमध्ये राहणारा आकाश सांगते आणि उज्जैनमध्ये राहणारी रितिका गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. या वर्षी 11 फेब्रुवारी रोजी दोघांनी देवासमधील आर्य समाज मंदिरात लग्न केलं होतं. हे लग्न दोघांच्या मर्जीने करण्यात आलं होतं. मात्र मुलीच्या घरातल्यांकडून या लग्नास परवानगी नव्हती. त्यांना मुलीने आकाशसोबत नातं ठेवणं आवडत नव्हतं. यासाठी त्यांनी इंदूर उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती.
उच्च न्यायालयात सुनावणीनंतर जेव्हा दोन्ही पक्ष न्यायालयातून बाहेर पडले तर उज्जैनच्या नागझिरी पोलिसांनी रितिकाला तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केलं. आकाशने याच्या विरोधात पत्रकार परिषदही घेतली होती. तो अधिकाऱ्यांसमोर आपल्या पत्नीला घेऊन जाण्याची परवानगी देण्यासाठी विनंती करीत होता.
हे ही वाचा-कंबरेपासून शरीराचे केले दोन तुकडे; अनैतिक संबंधातून क्रूरतेचा कळस, औरंगाबादेतील थरकाप उडवणारी घटना
आकाशची वागणूक पाहून मुलीच्या कुटुंबीयांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. गुरुवारी आकाशने आपल्या साथीदारांसह मिळून रितिकाच्या घरातल्यांना मारहाण केली आणि तिचं अपहरण करून घेऊन गेला. यादरम्यान रितिकाच्या आईवर तलवारीने हल्ला करण्यात आला. मुलीला घरातून पळून नेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kidnapping, Wife and husband