फटाका स्टीलच्या ग्लासमध्ये घालून फोडला; 9 वर्षाच्या मुलाच्या शरीराच्या चिंधड्या

फटाका स्टीलच्या ग्लासमध्ये घालून फोडला; 9 वर्षाच्या मुलाच्या शरीराच्या चिंधड्या

लहान मुलांकडे बरीक लक्ष ठेवावं लागतं कारण मुलं खेळता खेळता काय करामती करतील हे सांगता येत नाही. फटाक्याशी खेळताना एका चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. फटाक्याचा स्फोट इतका गंभीर होता की त्याच्या शरीराच्या अक्षरक्ष: चिंढड्या झाल्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर:  पालकांनो, तुमचं तुमच्या मुलांकडे लक्ष आहे ना? हा प्रश्न आम्ही विचारत आहोत कारण फटाक्याशी खेळताना एका मुलाचा जीव गेला आहे. दिल्लीच्या वायव्य(North West Delhi) भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. 9 वर्षाचा चिमुरडा फटाके (Cracker)फोडत होता. खेळता खेळता त्याने पेटलेला फटका स्टीलच्या ग्लासखाली ठेवला. फटका फुटला आणि जवळच असलेल्या त्या मुलाचा जीव गेला. प्रिन्स असं या दुसरीत शिकणाऱ्या मुलाचं नाव आहे. शुक्रवारी ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सध्या सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अलीपूरजवळच्या बखताबरपूर इथे घडली आहे. प्रिंस दास आपल्या आई वडिलांसोबत बखताबरपूर इथे एका कॉलनीमध्ये राहत होता. त्याचे वडील एका खासगी कंपनीत कामाला आहेत तर आई शेतात कामाला जायची. प्रिंस शांती निकेतन पब्लिक स्कूलमध्ये दुसरीत शिकत होता. त्यांच्या मृत्यूमुळे आई- वडिलांवर दु:खाचा डोंगर पसरला आहे. पोलिसांनी प्रिन्सचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी दिला आहे.

चिमुरड्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे

आई–वडील कामावर गेले असताना प्रिन्स आपल्या मित्रांसोबत एका रिकाम्या घरामध्ये खेळत होता. खेळता खेळता त्याने गंमत म्हणून जळता फटका स्टीलच्या ग्लासखाली ठेवला. बराच वेळ झाला पण फटका फुटला नाही. म्हणून तो पुन्हा फटाक्याजवळ गेला आणि अचानक फटाक्याचा स्फोट झाला. स्फोटामुळे स्टीलचा ग्लास फुटला. ग्लासचे तुकडे प्रिन्सच्या शरीरात घुसले. त्यात त्याचा मृत्यू झाला. प्रिन्सच्या घराच्या जवळपास अवैधरित्या फटाके कुठे बनवले जातात याचा तपास करत आहेत.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 31, 2020, 11:09 AM IST

ताज्या बातम्या