क्रूर बदला; गुप्तांगात मिरची पावडर टाकून VIDEO केला व्हायरल

क्रूर बदला; गुप्तांगात मिरची पावडर टाकून VIDEO केला व्हायरल

धक्कादायक, कर्ज फेडता न आल्यानं व्यक्तीला केली बेदम मारहाण, पीडितावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू.

  • Share this:

खरगोन, 6 ऑक्टोबर: कर्ज वसूल करण्याच्या हेतून व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात समोर आला आहे. कर्ज वसून न करता आल्यानं या व्यक्तीच्या प्रायवेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकल्याची माहिती समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मारहाणीत पीडित व्यक्तीचं कान, नाक, डोळे चेहरा आणि गुप्तांगात गंभीर जखम झाली असून स्थानिक रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिताने काही रक्कम काही महिन्यांपूर्वी कर्ज म्हणून घेतली होती. ही रक्कम काही कारणांमुळे परत करता आली नाही याचा राग मनात ठेवून कर्ज देणाऱ्याने पीडित व्यक्तीला बेदम मारहाण केली. त्यानंतर राग अनावर झाल्यानं प्रायवेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकून त्या पीडित व्यक्तीची छळ करण्यात आला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

दिल्लीमध्ये मागच्या वर्षी असाच धक्कादायक प्रकार समोर आला होता. एका घरामध्ये मुलींकडून सगळं काम करून घेतलं जात होतं. काम करण्यास मुलींनी विरोध केला तर

मिरची पावडर खायला लावयचे. त्यानंतरही मुलींनी विरोध केला तर त्यांच्या प्रायवेट भागांवर मिरची पावडर लावली जात असल्याची माहिती समोर आली होती. या घटनेची दिल्ली महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. आरोपींविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

5 वर्षांच्या मुलीची छेड काढणाऱ्याला बेदम मारहाण, VIDEO VIRAL

First published: October 6, 2019, 12:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading