Elec-widget

धक्कादायक! 12 वर्षांच्या मुलीवर 30 जणांकडून बलात्कार; वडिलांनी दिली नराधमांची साथ

धक्कादायक! 12 वर्षांच्या मुलीवर 30 जणांकडून बलात्कार; वडिलांनी दिली नराधमांची साथ

भयानक! 12 वर्षांच्या चिमुकलीवर 30 नराधमांनी केला बलात्कार.

  • Share this:

मालापूरम, 25 सप्टेंबर: केरळमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच एक मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. 12 वर्षांच्या चिमुकलीवर वडिलांच्या मित्रानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार जवळपास दोन वर्ष चालू होता आणि चिमुकलीवर बलात्कार केला जात असल्याची माहिती तिच्या वडिलांना होती त्यांची आणि इतर मित्रांची या कृत्याला साथ होती. केरळमधील मालापूरम या गावातील ही धक्कादायक घटना आहे. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त प्रसारित केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही चिमुकली विद्यार्थिनी शाळेत रोज गैरहजर राहात होती. शाळेतील पेरेंट्स-टिचर्स असोसिएशनच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली. चिमुकलीचं मनासिक संतुलन ठिक नसल्याचं शाळेतील शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी चाइल्ड लाईन अॅथोरिटीच्या मदतीनं चिमुकलीसोबत काय घडलं असावं याबाबत संवाद साधल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

21 सप्टेंबर रोजी चिमुकलीला चौकशीसाठी चाइल्ड वेलफेअर कमिटीसमोर उभं करण्यात आलं. त्यावेळी दोन वर्षांपासून 30 नराधम तिच्यावर बलात्कार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. चिमुकलीच्या जबाबानंतर पोलिसांनी 30 आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणात चिमुकलीचे वडील आणि त्यांचा खात्र मित्र सहभागी होते.

मुख्यमंत्र्यांची घोषणा, दुसरं लग्न केल्यास हिंदू पुरुषांवरही पोलीस कारवाई करा

धक्कादायक... 7 वर्षांच्या चिमुरडीवर 3 नराधम 8 महिन्यांपासून करत होते गॅंगरेप

धक्कादायक म्हणजे तिन्ही नराधम गेल्या 8 महिन्यांपासून हे कृत्य करत होते. शाळा सुटल्यानंतर नराधम पीडित चिमुरडीला मोडकळीस आलेल्या रिकाम्या इमारतीत नेऊन नराधन तिच्यावर आळीपाळीने बलात्कारकल्याण शहरात मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. 7 वर्षांच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी 3 नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे तिन्ही नराधम गेल्या 8 महिन्यांपासून हे कृत्य करत होते. शाळा सुटल्यानंतर नराधम पीडित चिमुरडीला मोडकळीस आलेल्या रिकाम्या इमारतीत नेऊन नराधन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत होते.

Loading...

घटनेला अशी फुटली वाचा...

पीडित चिमुरडी तिच्या चुलत बहीणीसोबत खेळत होती. खेळता खेळता पीडितेच्या वर्तवणुकीबाबत आजीला शंका आली. तिने मुलीला विश्वासात घेऊन मुलीची विचारपूस केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. आईनी ही बाब पीडितेच्या आई-वडिलांना सांगितली. नंतर थेट पोलिस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तिन्ही नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत.विक्रम पुरोहित (19), नवीन जसुजा (24) आणि अजय दोहारे (34) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे पोलिसही सून्न झाले आहेत. चिमुरडीची शाळा सुटल्यानंतर तिचा ऑटो रिक्षा येण्यात 15 मिनिंटांचा कालावधी लागत होता. या दरम्यान तिन्ही आरोपी पीडितेला मोडकळीस आलेल्या रिकाम्या इमारतीत नेऊन तिच्यावर बलात्कार करत होते. रिक्षाचालक तिला परत नेण्यासाठी येण्यापूर्वीच ते तिला परत शाळेबाहेर आणून सोडत असल्यामुळे हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही.

गवत सोडून खाल्लं जर्नल; IIT बॉम्बेच्या वसतीगृहात बैलाचा धुमाकूळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 02:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...