मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

SEX CD प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्याचा घुमजाव; तक्रार मागे घेण्यास तयार

SEX CD प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्याचा घुमजाव; तक्रार मागे घेण्यास तयार

Karnataka Sex Scandal: कर्नाटकातील येडियुराप्पा सरकारमधील मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहल्ली (Dinesh Kallahalli) यांनी Sex CD प्रकरणात तक्रार माघारी घेणार असल्याची घोषणा केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

बंगळुरू, 07 मार्च: एका कथित सेक्स सीडी (Sex CD) प्रकरणामुळे कर्नाटकातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. या प्रकरणामुळे कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांना राजीनामा द्यावा लागला आहे. जारकीहोळी यांच्यानंतर आपल्याही विरोधात बदनामीकारक मजकूर बाहेर काढला जाईल, अशी भीती बी.एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना वाटत आहे. त्यामुळे येडियुराप्पा सरकारमधील अर्धा डझन मंत्र्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून न्यायालयात धाव घेतली आहे. एकंदरित अशी परिस्थिती असताना आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.

कारण ज्या सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीमुळे भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी यांना राजीनामा द्यावा लागला, त्याच कार्यकर्त्याने आपली तक्रार मागे घेणार असल्याचं म्हटलं आहे. यावेळी संबंधित सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहल्ली यांनी सांगितलं की, जनता दल सेक्युलरचे नेते एच डी कुमार स्वामी यांनी या प्रकरणाचा सौदा पाच करोड रुपयांत केला असल्याचा आरोप केला आहे. या आरोपामुळे आपण दुखावलो आहे, त्यामुळे संबंधित तक्रार मागे घेत असल्याचं स्पष्टीकरण दिनेश कल्लाहल्ली यांनी दिलं आहे. असं असलं तरी काही तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेतला असल्याची माहिती संबंधित कार्यकर्त्याच्या वकिलांनी दिली आहे.

यादरम्यान, रमेश जारकीहोळीचा भाऊ बालचंद्र जारकीहोळी यांनी आरोप केला आहे की, राज्यात खूप मोठं षडयंत्र रचण्यात आलं आहे. सध्या देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणूका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. अशात चार तपास यंत्रणा रमेश जारकीहोळी यांची 'बदनामी' करण्यात व्यस्त आहेत. अशा प्रकारच्या षडयंत्रातून निवडणुकांपूर्वी भाजपवर चिखलफेक केली जात आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणीही बालचंद्र जारकीहोळी यांनी केली आहे. तसेच आपला भाऊ आणि संबंधित महिलेच्या कथित व्हिडिओत "छेडछाड" करण्यात आली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा - 'मराठी लोक चांगले पण कानडी XXX...' Sex Tape case मध्ये अडकलेल्या माजी मंत्र्याचं आणखी एक वादग्रस्त चॅट लीक

नेमकं प्रकरण काय आहे?

कर्नाटकातील येडियुराप्पा सरकारमधील मंत्री रमेश जारकीहोळी यांनी एका महिलेला कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड (KPTCL) मध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवलं होतं. नंतर त्यांनी ते आश्वासन पाळलं नाही, असा त्यांच्यावर आरोप केला गेला आहे. याबाबतची एक कथित सेक्स सीडी सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहल्ली यांनी सादर केली होती.

First published:

Tags: Crime news, Karnataka