मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /...अन् लेकासाठी माजी पोलीस बनला अट्टल चोर; तुरुंगवास झाला तरी करत राहिला गुन्हा

...अन् लेकासाठी माजी पोलीस बनला अट्टल चोर; तुरुंगवास झाला तरी करत राहिला गुन्हा

माजी पोलिसाला चोरीच्या आरोपात दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे.

माजी पोलिसाला चोरीच्या आरोपात दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे.

माजी पोलिसाला चोरीच्या आरोपात दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे.

बंगळुरू, 24 फेब्रुवारी : पोलीस एरवी चोरांना पकडतात पण लेकासाठी एक पोलीस मात्र स्वतःच चोर बनला आहे (Police became thief For son). एका माजी पोलिसाला चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) ही कारवाई केली आहे. चौकशीत आपल्या लेकासाठी असा गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली आहे.

नजीर अहमद इमरान (Nazeer Ahmed Imran)  उर्फ पिलाकल असं या व्यक्तीचं नाव असल्याचं सांगितलं जातं आहे. तो 61 वर्षांचा असून मूळचा केरळचा आहे. भारतात परतण्याआधी त्याने 9 वर्षे बहरीनमध्ये पोलीस म्हणून काम केलं आहे. पण आता त्याला चोरीच्या आरोपात 14 वर्षांत दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे.

झी न्यूजच्या वृत्तानुसार अशोकनगर पोलिसांनी नजीरला 2008 साली अटक केली. जामिनावर त्याची सुटका झाली. पण जेलमधून बाहेर आल्यानंतरही त्याने कारचोरी पुन्हा सुरू केली. नुकतीच एका सर्व्हिस  सेंटरमध्ये  एक एसयूव्ही कार चोरल्याच्या आरोपात ब्यातरयानपुरा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन बाईकही जप्त करण्यात आल्या आहेत.

हे वाचा - जीममध्ये एक्सरसाइझ करताना महिलेचा गेला जीव; CCTV कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यू

चौकशीत त्याने आपल्या मुलाच्या उपचारासाठी हा गुन्हा केल्याचं कबुल केलं. त्याच्या मुलाला कॅन्सर आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी पैसे लागणार होते. त्यामुळे एकेकाळी पोलीस असणारा नजीर चोर बनला. त्याने कार चोरी करायला सुरुवात केली. गाडी चोरून त्याची बनावट कागदपत्रं बनवून तो विकायचा असं त्याने सांगितलं. याचा पुढील तपास सुरू आहे.

First published:

Tags: Karnataka, Parents and child, Police, Thief