कानपूर, 24 फेब्रुवारी : लग्न ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट असते. ती व्हॅलेंटाइन डेला होणं हे तर त्याहून सुंदर स्वप्न असतं. मात्र या स्वप्नांची राखरांगोळी अशी 7 दिवसात होईल याची पुरटशी कल्पनाही तिला नव्हती. रविवारी संध्याकाळी नवविवाहित असलेल्या वधूच्या मृत्यूनं खळबळ उडाली. मृत वधूच्या कुटुंबियांनी हा मृत्यू आजारानं नाही तर सासरच्या जाचामुळे झाला असल्याचा आरोप लावला आहे. दोन्ही घरांमध्ये कलह सुरू झाले. हुंडा न दिल्यानं त्यांनी हुंड्यासाठी मुलीचा जीव घेतल्याचा आरोप वधु पक्षाने केला आहे. तर सासरच्यांनी मुलगी आजारी असल्याची बतावणी केल्यानं त्यांच्यात वाद उफाळून आला.
दरम्यान या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आता चौकशी सुरू आहे. तर तरुणीचा मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्य़ात आला आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर तपासाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.
हेही वाचा-गुंडांच्या हाणामारीचा भयानक VIDEO, थेट कुटुंबियांवरच चालवल्या तलवारी
सफीपुर उन्नाव निवासी दुर्गेश हा एका प्रायवेट कंपनीमध्ये कामाला आहे. त्याने आपल्या बहिणीचं म्हणजेच 20 वर्षांच्या मानवीचं लग्न 14 फेब्रुवारी व्हेलंटाइन डेला करून दिलं होतं. नरवल इथे राहणाऱ्या लवकुश नावाच्या तरुणासोबत तिचा विवाह झाला होता. विवाह होऊन अवघा एक आठवडा उलटला होता. लग्नामध्ये हुंड्यात कार न दिल्यानं तरुणीचा सासरच्यांकडून छळ केला जात होता. माहेरहून हुंडा घेऊन येण्यासाठी तगादा लावला होता. नवीन लग्न झालेल्या सुनेनं या गोष्टीला विरोध केल्यानंतर सासरच्यांकडून मारहाण सुरू झाली आणि अचानक शनिवारी संध्याकाळी तरुणीची तब्येत बिघडल्याचा फोन तिच्या माहेरी गेला. माहेरचे जेव्हा आपल्या मुलीला पाहायला आले तेव्हा तिचा मृतदेह समोर पाहून हडबडले आणि त्यांनी सासरच्यांवर हत्येचा आरोप करण्यास सुरुवात केली.
मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हुंड्यासाठी छळ करून तिची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप केला आहे. ही संपूर्ण घटना कानपूर इथल्या नर्वल पोलीस ठाणा क्षेत्रात घडली आहे. पोलिसांनी नववधूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणी चौकशी सुरू आहे.
हेही वाचा-मुलाने डोळ्यांदेखत पाहिले आईचे अनैतिक संबंध, नवऱ्याला कळायच्या आत असं संपवलं