मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! पार्टीसाठी घरी बोलवलं आणि मित्राच्या पत्नीवर केला बलात्कार, कर्नलविरुद्ध गुन्हा

धक्कादायक! पार्टीसाठी घरी बोलवलं आणि मित्राच्या पत्नीवर केला बलात्कार, कर्नलविरुद्ध गुन्हा

कानपूरमधील सेंट्रल ऑर्डिन्स डिपार्टमेंटमध्ये (COD) तैनात एका कर्नलवर मित्राच्या रशियन पत्नीवर (Russian Wife) बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात FIR दाखल करण्यात आली असून आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

    कानपूर, 14 डिसेंबर:  पार्टीसाठी जेवायला मित्र आणि त्याच्या पत्नीला बोलवलं आणि बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. उत्तर  प्रदेशातल्या (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) मधून एक हायप्रोफाईल बलात्कारचं (Rape) धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. कानपूरमधील सेंट्रल ऑर्डिन्स डिपार्टमेंटमध्ये (COD) तैनात एका कर्नलवर मित्राच्या रशियन पत्नीवर (Russian Wife) बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात FIR दाखल करण्यात आली असून आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काय आहे प्रकरण? या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कर्नलनं आपल्याला प्रमोशन मिळाल्याचा दावा करत त्याच्या मित्राला पत्नीसह रात्री घरी जेवायला बोलावले होते. ‘आरोपीनं नवऱ्याच्या दारुमध्ये गुंगीचं औषध मिसळलं होतं, या औषधामुळे तो बेशुद्ध झाला, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे. हे वाचा-Pub मध्ये विना मास्क हुल्लडबाजी करत होते लोक, BMC नं अचानक टाकला छापा ‘नवरा बेशुद्ध झाल्याचा फायदा घेत आरोपीनं बलात्कार केला. तसंच यावेळी मारहाण देखील केली’, अशी तक्रार पीडित महिलेनं केली आहे. कर्नलचा मित्र हा लखनऊमधील गोमती नगरचा रहिवाशी असून त्याने रशियन महिलेशी लग्न केले आहे. हे जोडपं गेल्या दहा वर्षांपासून भारतामध्ये राहत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर तिची मेडिकल टेस्ट करण्यात येणार आहे. या प्रकरणात आरोपी कर्नलच्या विरुद्ध बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या अटकेसाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Rape

    पुढील बातम्या