मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /घरी सोडतो म्हणून लॉजवर नेत गुगींचं औषध पाजलं; अल्पवयीन मुलासोबत घृणास्पद प्रकार

घरी सोडतो म्हणून लॉजवर नेत गुगींचं औषध पाजलं; अल्पवयीन मुलासोबत घृणास्पद प्रकार

सांकेतिक छायाचित्र

सांकेतिक छायाचित्र

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अजित मांढरे, प्रतिनिधी

ठाणे, 30 मार्च : अल्पवयीन मुलाला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी या रितेश दुसाने या नराधमाला अटक केली. या घटनेमुळे पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

पीडित मुलगा कल्याण पूर्व परिसरात राहतो. काल दुपारच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगा आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेला होता. पीडित मुलाने घरी येण्यासाठी रिक्षा पकडली. तो रिक्षाने घरी आला. मात्र, घराला टाळा असल्याने त्याला रिक्षाला देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तो पुन्हा रिक्षा घेऊन त्याच ठिकाणी आला. रिक्षा चालकासोबत या पीडित मुलाचे बोलणे सुरू असताना रितेश आपल्या दुचाकीवर त्याच ठिकाणी उभा होता. या नरधामाची नजर या मुलावर पडली. त्याने रिक्षाचालकाला रिक्षाचे पैसे देऊ केले. त्यानंतर पीडित मुलाशी ओळख वाढवली आणि मुलाला घरी सोडतो असे सांगून दुचाकीवर बसवून कल्याण पूर्व येथील एका लॉजवर घेऊन गेला. त्या ठिकाणी पीडित मुलाला कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचं औषध पाजत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी रितेश दुसाने या नराधमाला अटक केली.

वाचा - ही कसली चोरी करण्याची पद्धत; भयानक पद्धतीने लाखो रुपये लुटले, एकच खळबळ

32 वर्षीय महिलेनं अल्पवयीन मुलावर केले लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलावर 32 वर्षीय महिलेनं तीन वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कल्याणमधील कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून महिलेला अटक केली. अल्पवयीन मुलाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपी महिलाचं नाव कीर्ती घायवटे असे असून ती मूळची नाशिकची आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा कल्याण पूर्व येथे आपल्या आजीसोबत राहत आहे. तो एका इंग्रजी शाळेत नववीत शिकतो. आरोपी महिला नाशिकची रहिवासी असून, महिलेला दोन मुले आहेत. मुलाची मावशी नाशिकमध्ये राहते, आरोपी महिला आणि मुलाच्या मावशीचे जवळचे संबंध होते. मावशी जेव्हा कल्याणला यायची तेव्हा ती आरोपी महिलेलासोबत घेऊन यायची, त्यामुळे पीडित मुलगा आणि कीर्तीची ओळख झाली होती.

First published:
top videos

    Tags: Crime, Thane