प्रदीप भणगे, कल्याण, 4 फेब्रुवारी : कष्टाने करिअर घडवण्याच्या वयात दोन तरुण चक्क चप्पल चोरी करत असल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. या चप्पल चोरांनी एका वकिलाच्या कार्यालयाबाहेर गप्पा मारण्याचा अभिनय केला. त्यानंतर आजुबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेत हे या दोन्ही तरूणांनी अत्यंत सफाईने चप्पल चोरी केली आणि ते तेथून पसार झाले.
वकिलाच्या कार्यालयातून आधी हे तरूण बाहेर पडले. काही वेळाने ते दोघे ऑफिसच्या बाहेर उभे राहून वेळ घालवण्यास सुरुवात करतात, जेणेकरून ऑफिसमध्ये बसलेल्यांना या दोघांबद्दल काही शंका येऊ नये. जेव्हा या दोघांनाही समजले की कोणीही त्यांच्याकडे पाहात नाही, तेव्हा चप्पल चोरून दोघेही हसत-हसत निघून गेले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.