कल्याण, 23 मे: कल्याणमध्ये मुलं दत्तक
(Adoption) घेण्याची इच्छा असणाऱ्यांना बेकायदेशीररित्या मुलांची विक्री
(children selling) करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक
(Police Arrested Woman) केली आहे. महिला बाल संरक्षण कक्ष आणि कल्याण क्राईम ब्रांचच्या युनिटने केलेल्या कारवाईत हा
(kalyan women selling children) प्रकार उघड झाला. मुलं दत्तक घेण्याची इच्छा असणाऱ्यांना ही महिला हेरायची. तसंच गरीबांना पैशाचं आमिष दाखवून त्यांची मुलं अशा पालकांना विकायची. मात्र, पोलिसांनी कारवाई करत या महिलेसह मुलाची विक्री करणाऱ्या पालकांनाही ताब्यात घेतलं आहे.
(वाचा-आजार चालेल पण इंजेक्शन नको; कोरोना लसीच्या भीतीनं गावकऱ्यांनी मारल्या नदीत उड्या)
हा सगळा गोरखधंदा चालवणाऱ्या महिलेचं नाव आहे मानसी जाधव. मानसी ही काही महिने डोंबिवलीच्या बालसुधारगृहात काम करत होती. याठिकाणी काम करताना तिला मुलं दत्तक घेण्याची इच्छा असलेल्या अनेकांचे फोन नंबर मिळाले. मुलं दत्तक घेण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. तसंच मुल मिळण्यासाठी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागत असते. त्यामुळे ही महिला अशा पालकांना हेरून त्यांना या प्रक्रियेच्या गोंधळातून सोडवत मुलं मिळवून देण्याचं काम करायची. पण प्रत्यक्षात ती गरीब पालकांकडून मुलं विकत घेऊन अशा पालकांना विकत होती. दोन्ही प्रकारच्या गरजू लोकांना हेरून तिनं हा गोरखधंदा सुरू केला होता.
(वाचा-रायगड किनाऱ्यावर 3 दिवसांत सापडले 8 मृतदेह, P305 बार्जवरील कर्मचारी?)
या महिलेनं बालसुधारगृहात मुल दत्तक घेण्यासाठी अर्ज केलेल्या एका कुटुंबाला संपर्क केला. आपल्याकडे एक 5 वर्षांचं बाळ असून ते 2 लाखांत द्यायला तयार असल्याचं या महिलेनं त्यांना सांगितलं. प्रत्यक्षात या महिलेनं एका गरीब कुटुंबाला त्यांचं बाळ विक्री करण्यास राजी केलं होतं. या महिलेनं मुल दत्तक घेण्यासाठी कुटुंबाला विचारणा केली, त्यावेळी कुटुंबाला बेकायदेशीरपणे मुल दत्तक घेणं योग्य नसल्याची जाणीव झाली. त्यांनी याबाबत जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडं तक्रार केली. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत या विभागानं पोलिसांच्या मदतीनं सापळा रचला.
पोलिसांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कर्मचाऱ्यांनाच बनावट ग्राहक बनवलं. शनिवारी सकाळी या बनावट ग्राहकांनी सदर महिलेकडून 5 महिन्याच्या बालकाची 1 लाख 60 हजार आणि 30 हजार अशा 1लाख 90 हजारांत खरेदी केली. त्यानंतर या महिलेला आणि बाळाची विक्री करणाऱ्या आई वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. महिलेने याआधीही काही बाळांची विक्री केल्याची माहिती मिळाली आहे. त्याची चौकसी सुरू करण्यात आली आहे. मुल दत्तक घेणारं संबंधित कुटुंब सजग असल्यानं हा प्रकार टळला. पण अशाप्रकारे लहान मुलांच्या खरेदी विक्रीचा धंदा करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई झाली तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.