कल्याण, 21 ऑक्टोबर : ड्रग्ज माफियाविरोधात वारंवार तक्रार करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. हल्ला केल्यानंतर सदर सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असं हल्लेखोर पळून गेले. मात्र ते बचावले आहेत. तसंच सीसीटीव्हीत एक हल्लेखोर कैद झाल्याने या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आहे. आठ आरोपींपैकी चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. अन्य चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.
कल्याण डोंबिवलीत असे अनेक परिसर आहे. ज्या ठिकाणी लपून छपून ड्रग्जचा धंदा केला जातो. तरुण तरुणी ड्रग्जच्या आहारी गेले आहेत. ड्रग्ज माफियांनी कॉलेज आणि शाळेतील तरुणाईला लक्ष्य केलं आहे. कल्याण पश्चिमेतील बैलबाजार परिसरात काही वर्षापासून ड्रग्जचा धंदा सुरू असल्याने अनेक वेळा लोक पकडले गेले आहेत.
कल्याण पोलीस वारंवार कारवाई करत आहेत. मात्र तरीही हा धंदा जास्त फोफावला आहे. बैल बाजार परिसरात राहणारे आमीर खान यांनी ड्रग्ज माफियांच्या विरोधात आवाज उठवत त्यांची पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. चार वर्षापूर्वी बैलबाजार परिसरातील कुख्यात ड्रग्ज माफिया रहमत पठाण विरोधातसुद्धा तक्रार अमीर खान यांनी केली होती. वारंवार अमीर खान कडून केल्या जाणाऱ्या तक्रारीमुळे ड्रग्ज माफियांचा धंदा गोत्यात आला होता.
हे सर्व सुरू असताना आमीर हे रात्रीच्या वेळी घरी येत होते तेव्हा घराचा जिना चढत असताना काही अज्ञात लोक त्यांच्याजवळ आले. त्यांच्या तोंडावर कपडा टाकून त्यांच्यावर धारदार शस्त्रने वार केले. या प्राणघातक हल्यात ते बेशुद्ध झाले. त्यांना मयत समजून हल्लेखोर पसार झाले. मात्र परिसरात एका ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीत एक आरोपी कैद झाला. या आरोपीची ओळख पटल्याने पोलिसांना सर्व बाब लक्षात आली. या हल्यामागे कोण आहेत, याबाबत सध्या पोलीस तपास करत आहेत.
कल्याणच्या महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बनकर यांनी पोलीस अधिकारी गणेश कुंभार,दीपक सरोदय पोलीस कर्मचारी विजय भालेराव आणि दीपक सानप यांच्या एक पोलीस पथक तयार करुन तपास सुरू केला. याप्रकरणी आतापर्यंत आरोपी बबन वाणी, इर्शाद शेख, भूषण मोरे आणि संजय सिंग यांना अटक करण्यात आली आहे. अन्य 4 आरोपी रहमत पठाण, छोटे, इश्वर आणि सोनू सिंग यांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणातील इतर आरोपींना लवकरात लवकर अटक होईल, अशी माहिती कल्याण पवार यांनी दिली आहे.
Published by:Akshay Shitole
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.