मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

VIDEO: तीन वेळा कार अंगावर चढवून नगरसेवकाची निर्घृण हत्या; घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

VIDEO: तीन वेळा कार अंगावर चढवून नगरसेवकाची निर्घृण हत्या; घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

आरोपी कारचालकाने एका नगरसेवकाच्या अंगावर तीनवेळा कार चढवून अक्षरशः चिरडून मारलं आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतं आहे.

  • Published by:  News18 Desk

काकिनाडा, 12 फेब्रुवारी: आरोपींनी एका नगरसेवकाच्या अंगावर कार चढवून अक्षरशः चिरडून मारलं आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतं आहे. आरोपीने नगरसेवकाच्या अंगावर कार घालून तब्बल दोन वेळा कार पुढे-मागे केली आहे. या दुर्दैवी घटनेत नगसेवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे आरोपीला बेड्या ठोकल्या असून ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना आंध्रप्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील काकिनाडा येथील आहे. येथील एका नगरसेवकाला एका युवकाने कारने चिरडून मारलं आहे. या घटनेतील मृत नगरसेवकाचं नाव काम्परा रमेश असं असून गुरजाला चिन्ना नावाच्या आरोपीने त्यांना चिरडलं आहे. यावेळी काही प्रत्यक्षदर्शी लोकांनी या कारला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी गुरजालाने भररस्त्यात दोन वेळा कार मागे पुढे रमेश यांच्या अंगावर घातली आहे. या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हे ही वाचा-संतापजनक! उकळत्या पाण्यात टाकून सावत्र आईकडून दोन वर्षाच्या चिमुकल्याची हत्या

या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, हत्येपूर्वी रमेश यांनी त्याच्या मित्रांसोबत त्याच कार वॉश शेडमध्ये दारू पार्टी केली होती. पार्टी झाल्यानंतर घरी जाताना त्यांच्यावर हा दुर्दैवी हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांचा असा संशय आहे की, कदाचित जुन्या भांडणामुळे त्यांची हत्या केली असावी. काम्परा रमेश या नगरसेवकाचा मृत्यू दुर्दैवी असल्याचं मत आंध्रप्रदेशचे कृषी मंत्री कुरसाला कन्नबाबू यांनी व्यक्त केलं आहे. या प्रकरणी पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Andhra pradesh, Murder, Viral video.