लंडन, 12 डिसेंबर: लंडनमधील (London) एका महिलेसोबत खुपच धक्कादायक प्रकार घडला आहे. 21 वर्षीय मॅडी फोर्स्टर (Maddi Forster) नावाच्या महिलेला जॉगिंगला (Jogging) जाणं फारसं आवडत नाही आणि बर्याचदा ती जॉगिंग करण्यापासून दूर राहते. पण तिने पहिल्यांदाच जॉगिंगला जाण्याचा निर्णय घेतला आणि मॅडीसाठी तिचा हा निर्णय अत्यंत धोकादायक सिद्ध झाला आहे. मॅडी संध्याकाळी धावण्यासाठी बाहेर गेली होती. तेव्हा एका व्यक्तीने तिच्यावर हल्ला (Knife attack) केला. त्यानं मॅडीवर चाकूने चार वार केले. ज्यामध्ये ती जखमी झाली आहे. हल्लेखोर व्यक्तीला लाथा आणि ठोसे मारून तिने स्वतः चा प्राण वाचवला.
मॅडीने तिच्यासोबत घडलेली ही दुःखद घटना फेसबुकवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या जखमी पायाची छायाचित्रेही शेअर केली आहेत. अशा माथेफिरू लोकांपासून सावधगिरी बाळगायला हवी असंही तिने पोस्टमध्ये लिहीलं आहे. सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान तिच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला, ज्यामुळे तिच्या पायावर गंभीर जखम झाली आहे. तिची ही पहिली वेळ आणि शेवटची जॉगिंग असल्याचंही मॅडीनं म्हटलं आहे. तसेच ही पोस्ट लोकांनी जास्तीत जास्त शेअर करावी, जेणेकरून इतर लोकांना अशा भयानक अनुभवाला सामोरं जावं लागणार नाही.
सोमरसेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किंग्जवूडच्या ब्रूक रोड भागात 21 वर्षीय महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी या हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि जॉगिंगला येणाऱ्या लोकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. ही महिला सायकल मार्गावरून जॉगिंग करत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिच्यावर हल्ला केला आहे. त्यामुळे तिच्या पायावर जखमा झाल्या असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संध्याकाळच्या अंधारामुळे, या महिलनं काळसर वस्त्र परिधान केलेल्या हल्लेखोराला काळजीपूर्वक पाहिलेलं नाही, त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.