Home /News /crime /

गेल्या 20 वर्षांपासून नोकरी, पगार अवघा 9 हजार; वसतिगृहाच्या अधीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

गेल्या 20 वर्षांपासून नोकरी, पगार अवघा 9 हजार; वसतिगृहाच्या अधीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

इतका तुटपुंजा कधी कधी तर 3 महिने तर कधी 6 महिने उशिराने होत होता.

    नितीन कुमार/लातूर, 1 सप्टेंबर : लातूर जिल्ह्यातील (Latur News) चाकूर तालुक्यातल्या शेळगाव इथं एका अनुदानित वसतिगृहातील अधीक्षकानं तुटपुंजे मानधन ते सुध्दा वेळेवर होत नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यापूर्वीदेखील पगाराच्या कारणामुळे एका कर्मचाऱ्याने आत्महत्येचं धक्कादायक पाऊल उचललं होतं. यानंतर पुन्हा एकदा राज्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. शासनाने वसतिगृह कर्मचाऱ्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह संघटनेने दिला आहे. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील हेळब या गावी समाज कल्याण विभागाअंतर्गत नागाबुवा मागासवर्गीय वसतिगृह आहे. येथील चाकूर तालुक्यातील शेळगाव येथे 35 वर्षीय भरत किसन राजुरे हा गेल्या 20 वर्षांपासून वसतिगृह अधीक्षक पदावर नोकरी करत होते. सदरील वसतिगृह 100 % अनुदानित आहे. पण कर्मचाऱ्यांना मानधन तत्वावर नियुक्त्या दिल्या आहेत. सध्या हे कर्मचारी 9 हजार 200 रुपये मासिक मानधनावर काम करत होते. हे ही वाचा-सासरे अन् मेहुणीमुळे डॉक्टरची आत्महत्या; सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा पण अनेकदा सदरील मानधन कधी 3 महिने तर कधी 6 महिने उशिराने होत असे आणि 20 वर्षांपासूनची वेतनश्रेणीची मागणी प्रलंबीत होती. यामुळे यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असल्यानं त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कर्मचाऱ्याच्या वडिलांनी दिली आहे. या घटनेला राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Latur, Suicide

    पुढील बातम्या