इंदूर, 25 डिसेंबर : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh News) आगर-मालवामध्ये मेव्हणीसोबत असलेल्या प्रेम प्रकरणामुळे एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यक्तीने मेव्हणीच्या पतीला त्यांच्या मधुचंद्राच्या दिवशी धमकी दिली होती. त्याने फोन करून मेव्हणीच्या पतीला सांगितलं की, तिच्यापासून लांब राहा, ती माझी आहे. यानंतर मात्र मेव्हणीच्या पतीचा संताप झाला. त्यानेही या धमकीचा सूड उगवण्याचं ठरवलं. एक वर्षानंतर त्याने धमकी देणाऱ्या व्यक्तीची हत्या केली.
आपल्या चुलत भावाच्या मदतीने त्याने हा कट रचला. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 1 डिसेंबर रोजी गावातील 44 वर्षीय नूर मोहम्मद शेख याची अज्ञातांनी हत्या केली होती. पोलिसांनी आरोपीवर 10 हजार रुपयांचं बक्षीसही ठेवलं होतं.
आधीच तीन लग्न, त्यानंतरही मेव्हणीसोबत अवैध संबंध...
तपासात मिळालेल्या माहितीनुसार, नूर मोहम्मदने 3 लग्न केलं होतं. तिसरं लग्न त्याने गंगापूरमधील एका महिलेसोबत केलं होतं. तो पत्नी आणि चार मुलांसह तब्बल चार वर्षांपासून सासरी गंगापूरला राहायला आला होता. काही वेळानंतर तो आपल्या गावी निघून गेला होता. मात्र त्यापूर्वी सासरी राहत असताना मोहम्मदचं आपल्या मेव्हणीसोबत अवैध संबंध होते. नोव्हेंबर 2020 मध्ये मेव्हणीचं लग्न 22 वर्षीय अब्बू पठाण याच्यासोबत पार पडलं. ज्या दिवशी मेव्हणी सासरी पोहोचली, त्या रात्री मोहम्मदने मेव्हणीच्या पतीला फोन केला आणि त्याला धमकी दिली. तुझी पत्नी माझी आहे, तू तिच्यापासून दूर राहा. अन्यथा वाईट परिणाम होती. यानंतर रागाच्या भरात सोहेलने त्याच दिवशी मोहम्मदच्या हत्येचा प्लान आखला.
हे ही वाचा-72 वर्षांच्या प्रियकराने महिलेला हायवेवर फेकलं, तरीही 5 वेळा मृतदेहासमोरुनच गेला
30 नोव्हेंबर रोजी सोहेल आपल्या सासरी गंगापूर येथे आला होता. येथे त्याला मोहम्मद दिसला नाही. सोहेल येथून आपल्या 22 वर्षीय चुलत भावासोबत मोहम्मदच्या गावी गेला. येथे तो एकटा असल्याचं पाहून त्याच्या पोटात चाकू खुपसला.
पोलिसांनी केलेल्या तपासान सोहेल मोहम्मदच्या घरी असल्याचं समजलं. यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. शेवटी सोहेलने आपला गुन्हा मान्य केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh, Murder