मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

फोटोशॉप वापरून घेतलं बेरोजगारांच्या नावानं लोन, EMI देण्याची वेळ आली तेव्हा...

फोटोशॉप वापरून घेतलं बेरोजगारांच्या नावानं लोन, EMI देण्याची वेळ आली तेव्हा...

का ऑटो मोबाईल डिलरनं फोटोशॉपचा (Photoshop) वापर करत अनेक लोकांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. त्यानं सराईत पद्धतीनं बँकेतून लोन घेतलं. ज्या लाभार्थींच्या नावानं तो हे लोन घेत होता, त्यांना आणि बँकांना याचा काहीही पत्ता नव्हता.

  • Published by:  News18 Desk

रांची, 4 फेब्रुवारी :  एका ऑटो मोबाईल डिलरनं फोटोशॉपचा (Photoshop) वापर करत अनेक लोकांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. त्यानं सराईत पद्धतीनं बँकेतून लोन घेतलं. ज्या लाभार्थींच्या नावानं तो हे लोन घेत होता, त्यांना आणि बँकांना याचा काहीही पत्ता नव्हता. त्यांच्या खात्यामधून कर्जाचे हप्ते (EMI) सुरु झाल्याचंही त्यांना कळलं नाही. आता ही बातमी उघड झाल्यानंतर बँकांमध्येही खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

झारखंडची (Jharkhand) राजधानी रांची (Ranchi) मधील हा सर्व धक्कादायक प्रकार आहे. तेथील विनिता ऑटोमोबाईलचा डिलर रवी रंजन हा या प्रकारातला मुख्य आरोपी आहे. त्यानं या माध्यमातून एक नाही दोन नाही तर तब्बल आठ ऑटो रिक्षा चालकांची या माध्यमातून फसवणूक केली आहे. त्यांना ऑटो मिळालेच नाहीत पण त्यांच्या खात्यातून कर्जाची रक्कम वळती होत होती.

पंजाब अँड सिंध बँकेचे मॅनेजर रॉबर्टसन तिर्की यांनी दिलेल्या माहितीनुसार रवी रंजनद्वारा अनेक गाड्यांची डिलिव्हरी करण्यात आल्याचे पुरावे सादर करण्यात आले होते. त्याने त्या डिलिव्हरीचे फोटो देखील बँकेत सादर केले होते. ज्यामध्ये ग्राहकांना ऑटो दिल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात एकाही ग्राहकाला कधी ऑटो डिलिव्हर झालाच नाही.

कशी करत होता फसवणूक?

या प्रकरणातील अनेक लाभार्थींना आपल्याला ऑटो मिळाल्या आणि बँकेत लोन अकाऊंट सुरु झाल्याची माहिती नव्हती. तर, ‘रवीनं बँकेत फोन करुन आपल्याला खोटं बोलण्यास सांगितलं होतं,’ अशी माहिती वरुण या एका लाभार्थीनी दिली आहे. त्यानंतर वरुण जेव्हा बँकेत पोहचले तेव्हा त्यांना ऑटो डिलिव्हर झाली असून एका महिन्याचे लोन बँकेतून वळते करण्यात आले आहे, ही धक्कादायक माहिती समजली. तर अन्य एक लाभार्थी कुमार सोनी याच्या खात्यातून दोन EMI वळते करण्यात आले होते, तरीही त्यांना या प्रकरणाची कोणतीही कल्पना नव्हती.

अनेक जणांचा सहभाग?

आपलं बिंग उघड झाल्याचं लक्षात येताच आरोपी रवी रंजन बक्सर इथं पळून जाण्याची तयारी करत होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणात त्याला अनेकांनी मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे.

First published:

Tags: Crime news