Home /News /crime /

मुलाच्या मृत्यूचा बापानं घेतला बदला! महिलेचं शीर घेऊन पोहोचला पोलीस ठाण्यात

मुलाच्या मृत्यूचा बापानं घेतला बदला! महिलेचं शीर घेऊन पोहोचला पोलीस ठाण्यात

मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी वडिलांनी एका महिलेती हत्या केली.

    साहिबगंज, 09 जुलै: आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी वडिलांनी एका महिलेती हत्या केली. 60 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्रानं गळा चिरून शीर धडावेगळं करत शीर पोलीस ठाण्यात घेऊन आरोपी पोहोचला. हा संपूर्ण प्रकार पाहून पोलीसही चक्रावले. मात्र तातडीनं पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. झारखंडमधील साहिबगंजमधील मोहनपूर गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन दिवसांपूर्वी 25 वर्षीय तरुणाचा एका आजारामुळे मृत्यू झाला. मात्र गावात एकच चर्चा सुरू झाली की या मुलाचा मृत्यू जादूटोण्यामुळे झाला. 60 वर्षीय महिला मतलू चौडे या महिलेनं जादूटोणा केल्यानं स्वाधीन टुडूचा मृत्यू झाल्याची गावात अफवा पसरली आणि वडिलांना संताप अनावर झाला. हे वाचा-सर्वात मोठी बातमी! पोलिसांची हत्या करणाऱ्या गँगस्टर विकास दुबेला अखेर अटक मुलाच्या मृत्यूचं दु:ख पचवत त्यांनी सूड घ्यायचा निश्चय केला. मुलाचा मृतदेह सुरक्षित ठिकाणी ठेवून मंगळवारी रात्री वडील सकल टुडूने महिलेची धारदार शस्त्रानं गळा चिरून हत्या केली. हत्येनंतर महिलेचं शीर घेऊन थेट पोलीस स्थानक गाठलं आणि बदला पूर्ण झाल्याचं पोलिसांना सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. मुलाचा आणि हत्या केलेल्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. अफवा पसरवणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या