मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /जन्मानंतर काही तासांतच बाळाला विकण्याचा प्रयत्न, धक्कादायक माहिती उघड

जन्मानंतर काही तासांतच बाळाला विकण्याचा प्रयत्न, धक्कादायक माहिती उघड

झारखंडमध्ये एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला विकल्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

झारखंडमध्ये एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला विकल्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

झारखंडमध्ये एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला विकल्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Jharkhand, India

मृत्युंजय कुमार (बोकारो) 23 मार्च : झारखंडमध्ये एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला विकल्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. झारखंडमध्ये चतरा शहरातील शरद रुग्णालयातून नवजात शिशू अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान बेपत्ता झालेले नवजात शिशू बोकारो या गावात सापडल्याचे बोलले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे जन्मानंतर काही तासातच बाळाला हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याने साडेचार लाख रुपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे.

झारखंडच्या हजारीबागमध्ये राहणाऱ्या वीरेंद्र कुमार आणि रीना देवी यांनी साडेचार लाख रुपये देऊन मूल दत्तक माहिती हाती लागली आहे. याप्रकरणी तीन दलाल आणि कर्मचाऱ्याने साडेचार लाख रुपयांना बाळाला विकून व्यवहार केले आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच कारवाई करण्यात आली आहे.

हृदयद्रावक! तरुण मुलगा गमावला अन् जगण्यातली आस संपली, मातेनं उचललं टोकाचं पाऊल

पोलिसांनी रुग्णालय कर्मचारी आणि चतरा येथून एका दलालाला अटक केली आहे. त्याच्या सांगण्यावरून त्याच्यासह बोकारो येथून मूल दत्तक घेणाऱ्या दाम्पत्याला आणि एका दलालाला ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

चतरा येथील सदर पोलीस स्टेशन हद्दीतील दिभा महल येथे राहणाऱ्या आशा देवी यांनी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. त्याच्या जन्मानंतर काही वेळातच हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याने फिरायला नेण्याच्या बहाण्याने थेट रुग्णालयातून पळून जात साडेचार लाखांना व्यवहार केल्याची माहिती समोर आली. याबाबत पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या घटनेचा उकल झाला. चतरा पोलिसांनी कारवाई करत दलालाला पकडले आहे.

धक्कादायक! ..अन् पोलिसांनीच लंपास केले महिलेचे लाखोंचे दागिने; काय आहे प्रकरण?

त्यानंतर त्याच्या सांगण्यावरून बोकारो येथील आणखी एका दलाल आणि दत्तक जोडप्याला ताब्यात घेण्यात आले आहे. चतरा पोलिसांनी बेपत्ता नवजात बाळाला दलालासह बोकारो येथून चतरा येथे ताब्यात घेतले आहे. तेथे त्या लोकांची चौकशी केली जात आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी अधिक देण्यास टाळाटाळ केली.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news, Jharkhand, Local18