दुमका, 10 डिसेंबर : अमानुषपणाचा कळस आणि माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. जत्रेहून घरी परत जात असणाऱ्या 35 वर्षीय महिलेवर 17 नराधमांनी बलात्कार केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. मंगळवारी रात्री उशिरा 35 वर्षीय महिला जत्रेहून घरी जात असताना हा भयंकर प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून 17 नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
माणुसकीला काळीमा फासणारी घटना झारखंडमधील मुफस्सिल पोलीस ठाणा हद्दीत घडली आहे. पीडत महिलेलनं दिलेल्या फिर्यादीवरून 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तातडीनं त्यांना बेड्या ठोकण्याचे निर्देश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
Jharkhand: A 35-year-old woman was allegedly gang-raped by 17 men in Mufassil area of Dumka on Tuesday evening. "The incident allegedly took place when she was returning to her home from a market. She has been sent for a medical check-up," says DIG Sudarshan Mandal. (09.12) pic.twitter.com/7Rx3AOhLwg
पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन प्रसाद मंडळ म्हणाले की आरोपींपैकी एकाची ओळख पटवण्यात यश आले असून 35 वर्षीय महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. महिलेनं दिलेल्या फिर्यादीनुसार 17 जणांनी तिच्यावर बलात्कार केला असून एकाची ओळख पटवण्यात यश आलं आहे. हा आरोपी ज्या गावात महिला राहाते त्याच गावातील रहिवासी आहे.
पीडितेच्या पतीनं दिलेल्या माहितीनुसार गावात दर मंगळवारी आठवडा बाजार भरतो. तिथून पत्नी आणि मी सामान घेऊन येत असताना 17 मद्यधुंद तरुणांनी आमची वाट अडवली. 5 जणांनी मला घट्ट पकडून ठेवलं होतं. मी खूप प्रयत्न केला पण त्यांनी बांधून ठेवलं होतं. त्यांनी माझ्या पत्नीला जबरदस्तीनं झुडुपात नेलं आणि दुष्कर्म केलं अशी फिर्यात पोलिसांना दिली आहे.