Home /News /crime /

जवानाने AK 47 ने सहकाऱ्यांवर केला अंधाधुंद गोळीबार; वरिष्ठ अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

जवानाने AK 47 ने सहकाऱ्यांवर केला अंधाधुंद गोळीबार; वरिष्ठ अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

तर दुसरा एक अधिकारी जखमी झाला आहे.

    कलकत्ता, 6 ऑगस्ट : CISF च्या एका जवानाने कलकत्त्याच्या भारतीय संग्रहालयात आपल्या सहकाऱ्यांवर अंधाधुंद गोळीबार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. CISF जवानाची गोळी त्याच्या एका सीनियर अधिकाऱ्याला लागली, यात त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरा एक अधिकारी जखमी झाला आहे. आरोपीने गोळी चालवण्यासाठी कथितरित्या एके 47 चा वापर केला. आरोपी जवानाला अटक करण्यात आली आहे. हत्येमागील कारणाचा शोध घेतला जात आहे. एके 47 ची मॅगजीन रिकामी करुन आरोपीने केलं सरेंडर आरोपी हेड कॉन्स्टेबल एके मिश्रा यांनी सहायक उप-निरीक्षक रंजीत सारंगी यांला मारण्यासाठी एके 47 चा वापर केला. पॅरा मिलिट्री फोर्सच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सीआयएसएफचे महानिरीक्षक (दक्षिण पूर्व) सुधीर कुमार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपीला हत्यार टाकण्याचं आवाहन केल्यानंतर मिश्राने आत्मसमर्पण केलं. आरोपीने युनिटच्या शस्त्रागारातून बळजबरीने शस्त्र काढून संपूर्ण मॅगजीन रिकामी केली. गोळीबारानंतर दोन्ही जखमींना शासकीय एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आलं. येथे सारंगी यांचा मृत्यू झाला. सीआयएसएफने घटनेचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. सायंकाळी 6.30 च्या सुमारास ही घटना घडली

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या