जालना पोलीस दल हादरले, मुख्यालयातच एसआयने गोळी झाडून केली आत्महत्या

जालना पोलीस दल हादरले, मुख्यालयातच एसआयने गोळी झाडून केली आत्महत्या

सुभाष गायकवाड हे आज सकाळी 8.45 वाजेच्या दरम्यान स्कॉटिंग करून पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात गेले होते.

  • Share this:

जालना, 08 सप्टेंबर : जालना पोलीस मुख्यालयात एका सहायक फौजदाराने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहायक फौजदार सुभाष गायकवाड असं त्यांचं नाव आहे. या घटनेमुळे मुख्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

सुभाष गायकवाड यांनी मंगळवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास पोलिस मुख्यालयात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

उपसभापती निवडणुकीत भाजपची खेळी, थेट कोर्टाचे ठोठावले दार, सांगितले 'हे' कारण...

पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहायक फौजदार सुभाष गायकवाड हे आज सकाळी 8.45 वाजेच्या  दरम्यान स्कॉटिंग करून पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात गेले होते.

त्यादरम्यान, शस्त्रागार विभागाच्या पाठीमागे जाऊन त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यातच ते गतप्राण झाल्याचे समजते.

अंदाज चुकला अन् व्यापारी लिफ्टखाली चिरडला, मुंबईतील धक्कादायक घटना

घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) अभय देशपांडे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, संजय लोहकरे, यशवंत जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल आहे. गायकवाड यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजून आलेले नाही.

Published by: sachin Salve
First published: September 8, 2020, 11:04 AM IST
Tags:

ताज्या बातम्या