जालना, 28 मे : प्रेम प्रकरणातून (Love Affair) आई वडिलांचा झालेला अपमान (mother father insult) जिव्हारी लागल्यामुंळ पश्चात्तापातून तरुणानं आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार भोकरदन (Bhokardan Jalna) तालुक्याच्या वालसंगी शिवारत घडला. तरुणानं झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यानं फेसबूक लाईव्हवर व्हिडिओ करत आत्महत्या (Jalna facebook live suicide) करत असल्याचं सांगितलं. आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार ठरवू नये असं त्यानं व्हिडिओत म्हटलं आहे.
(वाचा-कोविड सेंटरमधील नर्सच्या रुममध्ये घुसून विनयभंग; सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल)
सिल्लोड तालुक्यातील हत्ती बाहुली गावातील एकवीस वर्षीय तरुण सुमीत किशोर पारधे या तरुणाचे प्रेम प्रकरणातून वाद झाले होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या या वादातून त्यांच्या आई वडिलांवर माफी मागण्याची वेळ आली होती. आई वडिलांचा झालेला हा अपमान सुमीत याच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. हा अपमान सहन झाला नाही, आणि आई वडिलांची इज्जत आपण धुळीत मिळवली या अपराधी भावनेनं सुमीतनं आत्महत्या केली.
(वाचा-क्रूरतेचा कळस! पुण्यात विकृताने धारदार शस्त्राने मुक्या जीवाचे फोडले डोळे)
हा तरुण भोकरदनच्या वालसंगी गावातील नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होता. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकांची दुचाकी पंक्चर झाली. त्यावेळी शिवना गावात नातेवाईत दुचाकी दुरुस्त करण्यासाठी थांबले होते. तेव्हा तरुण गोळ्या आणायला जात असल्याचं सांगून तिथून निघाला. वलसांवंगी शिवारात असलेल्या वनीकरण विभागाच्या झुडपात जाऊन त्यानं गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं फेसबूकवर लाईव्ह करत व्हिडिओवर यामागचं कारण सांगितलं.
तरुणानं त्याच्या व्हिडिओत म्हटलं की, ज्या आई वडिलांच्या डोळ्यात मी आजवर एकदाही पाणी येऊ दिलं नाही, त्यांना माझ्यामुळं खाली पाहावं लागलं. समाजात त्यांचा मोठा अपमान झाला आहे. मी दारु पिऊन खूप चुका केल्या. त्या चुकांसाठी माफी मागतो असंही तो म्हणाले. आई वडिलांच्या अपमानाच्या दुःखाने आत्महत्या करत असून यासाठी कोणालाही दोषी ठरवू नये असं त्यानं व्हिडिओत म्हटलं. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Facebook, Suicide news