इम्तियाज अली, जळगाव, 26 मार्च : किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर सख्ख्या भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लहान भावाने धारदार विळ्याने भावाचा खून केला. जळगाव जिल्ह्यातल्या पारगावमध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली. संदीप प्रताप पाटील असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मितावली इथे प्रताप मंगा पाटील हे पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. दोन्ही मुले त्यांची १० एकर शेती एकत्रच करतात. शनिवारी सकाळी संदीप पाटील आणि सतीश पाटील हे शेतात भेंडी तोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा लहान भाऊ सतीशने मोठा भाऊ संदीपवर धारदार विळ्याने वार केला.
घरी परताच मुलीची 'ती' अवस्था पाहून आई, वडिलांनी फोडला हंबरडा, घटनेनं पंढरपुरात खळबळ
शेत गावापासून दूर असल्यामुळे खूनाची घटना लवकर उघडकीस आली नाही. खून केल्यानंतर आरोपी सतीश हा शेतातच थांबला होता. या प्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानतंर सतीश पाटीलला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. तसंच जळगावमधून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.