मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

जळगाव : खेळता खेळता 5 वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्देवी मृत्यू; कुटुंबावर शोककळा

जळगाव : खेळता खेळता 5 वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्देवी मृत्यू; कुटुंबावर शोककळा

अनैतिक संबंधात पतीचा होता अडथळा, पत्नीने सुपारी देऊन केला गेम (प्रातिनिधिक फोटो)

अनैतिक संबंधात पतीचा होता अडथळा, पत्नीने सुपारी देऊन केला गेम (प्रातिनिधिक फोटो)

या घटनेची माहिती मिळताचा नातेवाईकांना घटनास्थळी धाव घेवून हंबरडा फोडला.

    जळगाव, 7 एप्रिल : जळगावातील (Jalgaon News) तांबापूरा येथील हनुमान मंदीराच्या पटांगणात खेळत असलेल्या 5 वर्षीय चिमुकल्याला विजेचा जोरदार धक्का लागल्याने दुदैवी मृत्यू (5 years boy death) झाल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  तुषार उर्फ आरू शिवाजी सुरवाडकर असे मृत चिमुरड्याचं नाव आहे. जळगाव गवळीवाडा येथील हनुमान मंदीराच्या पटांगणात तुषार सुरवाडकर हा चिमुकला व त्याचा मोठा भाऊ महेश आणि गल्लीतील काही मुले खेळत होती. त्यावेळी मंदिराच्या संरक्षण भिंतीच्या लोखंडी जाळीला तुषारचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तुषारचा जागीच मृत्यू झाला. हे ही वाचा-गडचिरोली :17 वर्षांच्या मुलीची हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीचं भयंकर कृत्य या दुर्घटनेत इतर खेळत असलेले लहान मुले बचावले आहे. या घटनेची माहिती मिळताचा नातेवाईकांना घटनास्थळी धाव घेवून हंबरडा फोडला. कुलरचा शॉक लागल्याने चंद्रपुरातील 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू चंद्रपुरातील (Chandrapur News) महेश जेंगठे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. यातील युग हा लहान मुलगा होता. कुलरचा शॉक लागल्यामुळे या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. कुलरचा शॉक लागल्यामुळे युगचा जागीच मृत्यू झाला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गजानन मंदिर परिसरातील आहे. युग हा अवघ्या 5 वर्षांचा होता. आज दुपारी खेळताना युगचा हात कुलरच्या स्टँडला लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. युगचे वडील महेश जेंगठे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असून त्यांना दोन मुले असून युग हा लहान मुलगा होता. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Jalgaon

    पुढील बातम्या