Home /News /crime /

जळगावमध्ये सामूहिक अत्याचार प्रकरण : 20 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप

जळगावमध्ये सामूहिक अत्याचार प्रकरण : 20 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप

सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी याप्रकरणी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केला आहे.

    जळगाव, 10 नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यातील टोळी गावातील सामूहिक अत्याचार झालेल्या तरुणीचा धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसापूर्वी पारोळा येथे पीडित 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाला होता. पीडित तरुणीचे शवविच्छेदन पूर्ण झाले असून धुळ्यात इन पॅनल शवविच्छेदन करण्यात आले. मात्र त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी याप्रकरणी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केला आहे. 'पोलिसांनी या प्रकरणातील तपास करताना दिरंगाई केली,' असं सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. पोलिसांनी खरंच अशी दिरंगाई केली का आणि केली असेल तर कोणत्या दबाव्यातून? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केली कारवाईची मागणी 'जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात एका युवतीवर बलात्कार आणि नंतर विष देऊन झालेली हत्येची घटना अतिशय गंभीर आहे. राज्यात महिला अत्याचाराची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच आहेत. पण, कुठेही त्यावर उपाययोजना होताना दिसत नाहीत. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी. जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवून त्या नराधमांना शिक्षा व्हावी. नसत्या गोष्टींत वेळ घालवायचा आणि महिला सुरक्षेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे, असे करून चालणार नाही. माझी विनंती आहे,महिला सुरक्षेला राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे,' असं ट्वीट करत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Crime news, Jalgaon

    पुढील बातम्या