मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मौजेसाठी दुचाकींची चोरी, पोलिसांनी ठेचल्या नांग्या, एक-दोन नव्हे तब्बल 'इतक्या' दुचाकींची चोरी

मौजेसाठी दुचाकींची चोरी, पोलिसांनी ठेचल्या नांग्या, एक-दोन नव्हे तब्बल 'इतक्या' दुचाकींची चोरी

आरोपी चोराचा फोटो

आरोपी चोराचा फोटो

दुचाकींची चोरी करून आणि आपल्याच ओळखीच्या व्यक्तीकडे चोरीची दुचाकी गहाण ठेवून त्यावर मिळालेल्या पैशातून मौजमजा करणाऱ्या एका तरुणास जळगाव शहर पोलिसांनी शिफातीने ताब्यात घेतले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India

नितीन नांदुरकर, जळगाव, 14 सप्टेंबर : दुचाकींची चोरी करून आणि आपल्याच ओळखीच्या व्यक्तीकडे चोरीची दुचाकी गहाण ठेवून त्यावर मिळालेल्या पैशातून मौजमजा करणाऱ्या एका तरुणास जळगाव शहर पोलिसांनी शिफातीने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या तरुणाकडून एक-दोन नव्हे तर तब्बल 11 चोरीच्या दुचाकी देखील जप्त केल्या आहेत.

पवन पाटील असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाचे आई-वडील हे गुजरातमधील सुरत येथे राहतात. पवन हा जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातल्या आव्हाने गावात आपल्या आजीसोबत राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पवनचे वडील देखील दुचाकी चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याबाबत देखील पोलीस तपास घेत आहेत.

(घरात सलग दुसऱ्यांदा मुलीचा जन्म झाल्याने आजोबा नाराज, दारू पिऊन घेतला टोकाचा निर्णय)

मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन मौजमजा करण्यासाठी आणि आपले शौक पूर्ण करण्यासाठी पवन पाटील याने गाड्यांची चोरी केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आरोपीने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक ठिकाणावरून दुचाकी चोरी करून आपल्याच नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींकडे चोरीची दुचाकी गहाण ठेवून त्यावर मिळालेल्या पैशातून तो आपले शौक पूर्ण करत असल्याची माहितीही पोलिसांनी मिळाली आहे.

दरम्यान पवन पाटील यास ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी जळगाव, नाशिकयासह गुजरात आणि मध्य प्रदेशातून चोरी केलेल्या तब्बल 11 दुचाकी जप्त केल्या आहेत. अजूनही दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Thief