Home /News /crime /

एकाच रात्रीत 4 ठिकाणी चोरीच्या घटनांमुळे जळगाव हादरलं; पहाटे 3.30 वाजता घरात घुसले चोर आणि...

एकाच रात्रीत 4 ठिकाणी चोरीच्या घटनांमुळे जळगाव हादरलं; पहाटे 3.30 वाजता घरात घुसले चोर आणि...

जळगावमध्ये पोलिसाच्या घरातच चोरांनी चोरी केली आहे. परिसरात यामुळं भितीचं वातावरण आहे.

    जळगाव, 14 फेब्रुवारी : जळगाव शहरात चोरी-दरोड्याचे (robbery) प्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीत असं चित्र आहे. बारा दिवसांपूर्वी शहरात दरोडा पडला. त्याचा तपास लागलेला नाही. आणि आता रविवारी पहाटे पुन्हा खेडी इथं एक खळबळजनक प्रकार घडला आहे. चोरांनी एका वृद्ध दाम्पत्याला आणि 12 वर्षांच्या तिच्या नातवालाही बेदम मारहाण करत कपाटातील रोख रक्कम (money) आणि दागिने (jewellery) चोरले. हा सगळा ऐवज लाखो रुपयांचा आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजता (early morning) ही घटना घडली. या घरात प्रवेश करण्याआधी चोरट्यांनी याच परिसरात यमुना नगरातील विजय सुखदेव चव्हाण यांच्या घरातून सुटकेस पळवली. याशिवाय गुरुदत्त नगर इथं योगेश भानुदास पाटील यांच्या इथंही असाच प्रयत्न केला. मात्र पाटील जागे झाले आणि त्यांनी चोरांना चांगलाच दम भरत शिवीगाळ केली. त्यामुळं चोरांनी पळ काढला. एकाच रात्री चार ठिकाणी झालेल्या या घटनांनी खेडी गाव हादरलं आहे. योगेश जगन्नाथ भोळे हे नंदुरबार पोलीस दलात (police force) कार्यरत आहेत. त्यांचं खेडी इथं गावाच्या बाहेर श्रीकृष्ण मंदिराजवळ दुमजली घर आहे. त्यांचा मोठा भाऊ विकास आर्मीमध्ये आहे. इतर दोन्ही भाऊ नोकरीला आहेत. त्यांच्या घरी आई-वडील सुशीलाबाई आणि जगन्नाथ भोळे, मोठ्या भावाची पत्नी हर्षा आणि त्यांच्या मुलगा असे राहतात. हेही वाचा प्रेयसीसोबत पळालेल्या 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल शनिवारी सकाळी त्यांचा भाचा सिद्धांत दांडगे घरी आलेला होता. हे वृद्ध दाम्पत्य आणि सिद्धांत एका खोलीत आणि हर्षा आणि त्यांचा मुलगा झोपले होते. पहाटे तीन वाजता मागच्या गेटवरून उडी मारून तीनजण आतमध्ये आले. त्यांनी सोबतच्या हत्यारानं दरवाजाची कडी तोडली आणि आत प्रवेश केला. एकानं दरवाजाच्या बाजूला ठेवलेली बॅट (bat) नातवाच्या खांद्यावर मारली. नातवाला वाचवायला धावून आलेल्या सुशीलाबाई आणि जगन्नाथ भोळे यांच्या डोक्यातही बॅट घातली. जगन्नाथ हे जागेवरच बेशुद्ध पडले. चोरट्यांनी काही क्षणातच सुशीलाबाई यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढलं आणि कपाटातील रोख रक्कम व दागिने घेऊन पळ काढला. हे चोर मागच्या दरवाज्यानं शेताकडे निघून गेले. पोलीस आता पुढचा तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Jalgaon, Money, Robbery Case

    पुढील बातम्या