मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /दोन महिन्याचे बाळ दगावल्याने बांध फुटला अन्.. जळगाव शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार

दोन महिन्याचे बाळ दगावल्याने बांध फुटला अन्.. जळगाव शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार

जळगाव शासकीय रुग्णालय

जळगाव शासकीय रुग्णालय

जळगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपलं दोन महिन्यांचं बाळ दगावल्याने नातेवाईकांनी गोंधळ घालत रुग्णालयाचे नुकसान केलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India

नितीन नांदूरकर, प्रतिनिधी

जळगाव, 23 मे : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन महिन्याचा बालक उपचारादरम्यान दगावल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. परिचारिका कक्षाची तोडफोड करून औषधांचे रॅक फेकून नुकसान केल्याची घटना आज घडली आहे. तसेच रुग्णालयीन कागदपत्रांची कार्यवाही न करता मयत बालकाला घेऊन पसार झाले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रुग्णालय प्रशासनातर्फे तक्रार देण्यात आली आहे.

चोपडा तालुक्यातील पुनगाव येथील रहिवासी असलेले विजय कोळी यांनी त्यांच्या दोन महिन्याच्या बाळाला सोनल हिस सोमवार 22 मे रोजी संध्याकाळी प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे दाखल केले होते. दरम्यान रुग्णाची प्रकृती खूप गंभीर होती. रुग्णाला न्युमोनिया आणि झटके येत होते. याबाबतची कल्पना बालरोग विभागाच्या डॉक्टरांनी रुग्णाच्या कुटुंबीयांना दिली. रुग्णाला 14 नंबर आयसीयू विभागात भरती देखील केले. रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

वाचा - माता न तू वैरिणी; आईनेच आपल्या मुलींना देहव्यापारासाठी विकलं, नागपुरात खळबळ

याबाबत डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना कळविले. मात्र, बालकाचा मृत्यू झाल्याबद्दल समजूतदारपणाची भूमिका न घेता नातेवाईकांनीच डॉक्टरांवर व परिचारिकांवर संताप व्यक्त केला. शिविगाळ करून त्यांनी औषधे ठेवलेला रॅक जोरात फेकून दिला. त्यामुळे औषधींचे नुकसान झाले. तसेच बाहेर जात असताना परिचारिका कक्षाजवळ जात त्यांनी कक्षाची काच फोडली. त्यामुळे कक्षामध्ये काचांचा खच पडला. परिचारिका व डॉक्टर समजावीत असताना त्यांना शिवीगाळ केली. त्याच वेळेला रुग्णाच्या महिला नातेवाईकांनी मयत बाळाला घेऊन बाहेर पोबारा केला. याबाबत वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

हत्याकांडाने भुसावळ हादरलं

भुसावळमध्ये मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास दुहेरी हत्याकांड उघड झाले. शहरातील वांजोळा रोड भागात रेल्वे विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याने पत्नीसह आईची हत्या केली असून, त्याचा शालक या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. वांजोळा रोडवरील शगुन इस्टेट भागातील रहिवासी हेमंत भूषण हा रेल्वेत नोकरीला आहे. मध्यरात्री त्याचा आई आणि पत्नी यांच्याशी कौटुंबिक वाद झाला. पहाटे त्याने संतापाच्या भरात आई सुशीलादेवी (60) आणि पत्नी आराध्या (24) यांना लोखंडी तव्याने मारहाण केली. त्यात अतिरक्तस्त्राव होऊन दोघींचा मृत्यू झाला. दाम्पत्यांमध्ये या ना त्या कारणातून नेहमीच वाद होत होता.

First published:
top videos

    Tags: Crime, Jalgaon