मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

महागडी Jaguar कार..देशातील विविध भागात 10 बायका; चोरीच्या पैशातून उभा केला 'प्रपंच'

महागडी Jaguar कार..देशातील विविध भागात 10 बायका; चोरीच्या पैशातून उभा केला 'प्रपंच'

गँगमधील हा सदस्य चोरी करण्यासाठी विविध शहरांमध्ये फ्लाइटने जात असे आणि चोरीच्या रकमेतून त्याने जॅगुआर ही महागडी कार खरेदी केली होती.

गँगमधील हा सदस्य चोरी करण्यासाठी विविध शहरांमध्ये फ्लाइटने जात असे आणि चोरीच्या रकमेतून त्याने जॅगुआर ही महागडी कार खरेदी केली होती.

गँगमधील हा सदस्य चोरी करण्यासाठी विविध शहरांमध्ये फ्लाइटने जात असे आणि चोरीच्या रकमेतून त्याने जॅगुआर ही महागडी कार खरेदी केली होती.

  • Published by:  Meenal Gangurde

गाजियाबाद, 9 सप्टेंबर : कविनगर पोलिसांनी शहरातील स्‍टील व्यावसायिक कपिल गर्गच्या कोठीतून 1 कोटी रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश केला आहे. गँगमधील एक गुंड चोरीचा पर्दाफाश केला आहे. गँगमधील (Gang) हा सदस्य चोरी करण्यासाठी विविध शहरांमध्ये फ्लाइटने जात असे आणि चोरीच्या रकमेतून त्याने जॅगुआर ही महागडी कार खरेदी केली होती. जी त्याच्या पत्नीच्या नावावर आहे. (Ghaziabad news)

पोलिसांनी या गुंडाची एक पत्नी आणि दोन गुंडाना अटक केलं आहे. गँगमधील या सदस्याला 10 पत्नी आहेत आणि या देशातील विविध शहरांमध्ये राहतात. त्यांच्या मदतीने तो विविध ठिकाणी चोरीचं कट रचत होता. पोलिसांनी या गुंडाजवळून एक जॅगुआर आणि एक स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे. (Jaguar bought with stolen money There are 10 wives in different parts of the country)

हे ही वाचा-वेगवेगळ्या पुरुषांसह 25 वेळेस घरातून पळाली महिला; मात्र तरीही पती लावतो जीव

गाजियाबादमधील एसपी सिटी प्रथम निपुण अग्रवाल यांनी सांगितलं की, सीतामडी, बिहार निवासी विक्रम शाह, मोहम्मद शोएब आणि मुख्य आरोपित इरफान याची पत्‍नी गुलशन प्रवीण याला अटक केली आहे. इरफान आणि इमरान सध्या फरार आहे. शोएब, इरफानचा चालक आहे. तर विक्रम शाह कोठींची रेकी करीत होता. इरफानवर उत्तर प्रदेशातील आग्रा, दिल्ली, पंजाब, गोवा, बिहार सह अन्य राज्यांमध्ये अधिक गुन्हेगारीची प्रकरण दाखल आहेत. इरफानजवळ महागडी जॅगुआर कार आहे. जी त्याच्या पत्नीच्या नावावर आहे. या कारमध्ये इरफान चालकाच्या सोबत असून चोरी करतो. महागडी कार असल्या कारणाने कोणीही शंका घेत नव्हतं. तो जिथे कुठेही जातो तो फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबतो.

पोलीस ठाण्याचे प्रभारी कविनगर संजीव कुमार शर्माने सांगितलं की, इरफान देशभरात 50 हून अधिक चोऱ्या केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याने राजनगर सेक्टर तीनमधील एका खोलीतूनही चोरीचा प्रयत्न केला. मात्र ती यशस्वी होऊ शकला नाही. त्याचा फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं. तपासात समोर आलं आहे की, इरफानने अनेक भागात चोरी केली आहे. त्याला 10 पत्नी आहेत. ज्या वेगवेगळ्या शहरांमध्ये राहतात आणि चोरीसाठी त्याला मदत करतात.

First published:

Tags: Crime news, Theft