Home /News /crime /

पुण्यातील IT इंजिनिअर तरुणीचा पाठलाग करून भररस्त्यात फाडले कपडे, रात्रपाळी संपवून घरी जाताना घडला प्रकार

पुण्यातील IT इंजिनिअर तरुणीचा पाठलाग करून भररस्त्यात फाडले कपडे, रात्रपाळी संपवून घरी जाताना घडला प्रकार

Crime in Pune: आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या तरूणीसोबत एकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी युवकाने पीडितेचा पाठलाग करून तिच्या अंगावरील कपडे फाडले आहेत.

    पुणे, 01 मे: काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका आयटी कंपनीत (IT Firm) काम करणाऱ्या तरुणीला गुंगीचं औषध देऊन कॅब चालकानं बलात्कार (rape in pune) केला होता. ही घटना ताजी असताना, आता पुण्यातून आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या तरूणीसोबत एकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी युवकाने पीडितेचा पाठलाग करून तिला पकडलं आणि तिच्या अंगावरील कपडे फाडले आहेत. संबंधित संतापजनक घटना मुंढव्यातील केशवनगर परिसरात गुरुवारी पहाटे घडली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. 27 वर्षीय पीडित तरुणी एका नामांकीत आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत असून ती गुरूवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास रात्रपाळी संपवून घरी चालली होती. यावेळी दुचाकीवरून एकटी घरी जात असल्याचं पाहून एका अज्ञात युवकाने तिचा पाठलाग करायला सुरुवात केली. यावेळी संबंधित आरोपी युवकानं अंगात शर्टही घातला नव्हता. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने तिची दुचाकी वेगाने पळवायला सुरुवात केली. तेव्हा आरोपीनंही तिचा पाठलाग सुरू ठेवला. दरम्यान पीडित तरुणीची दुचाकी घराजवळील एका सोसायटीत असलेल्या स्पीड ब्रेकरवरून आदळली. त्यामुळे ती खाली पडली. यावेळी पाठलाग करणाऱ्या युवकानं पीडितेजवळ येऊन तिचे कपडे फाडले आणि तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही सर्व घटना अचानक घडल्यानं घाबरलेल्या तरुणीनं आरडाओरडा करायला सुरुवात केली. तेव्हा सोसायटीचा सुरक्षा रक्षक तिच्या मदतीला धावून आला. त्यानंतर आरोपी युवक घटनास्थळावरून फरार झाला. यावेळ त्याने अंगात शर्टही घातला नव्हता शिवाय तोंडाला मास्क लावून चेहरा झाकला होता. हे ही वाचा- पुण्यातील धक्कादायक घटना! IT कंपनीतील तरुणीवर कॅब चालकाचा बलात्कार; गुंगीचं औषध देऊन अत्याचार दैनिक पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, 27 वर्षीय पीडित तरुणीनं कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा कोणत्याही पुरावा अद्याप पोलीसांच्या हाती लागला नसून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. कोंढवा पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune

    पुढील बातम्या