Home /News /crime /

यूपीचा आहे का? वडिलांसमोर मुलाला लोखंडी रॉडने अमानुष मारहाण, औरंगाबादेतील घटना

यूपीचा आहे का? वडिलांसमोर मुलाला लोखंडी रॉडने अमानुष मारहाण, औरंगाबादेतील घटना

मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेला 24 तास उलटूनही पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही.

    सचिन जिरे, प्रतिनिधी औरंगाबाद, 11 ऑगस्ट : वडिलांच्या चष्म्याच्या दुकानातील काचा आणण्यासाठी बाजार गेलेल्या तरुणाला उत्तर प्रदेशचा परप्रांतीय असल्याने 5 ते सहा जणांनी लोखंडी रोडने बेदम मारहाण केल्याचा घटना शहरातील औरंगपुरा भागात घडली. मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेला 24 तास उलटूनही पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही तरुणावर शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. साहिब अख्तर फहींम अख्तर असं जखमी 20 वर्षीय तरुणाचे नाव आहे. साहिब हा पुणे येथील आय.एच.एम. चा विद्यार्थी असून लॉकडाउनमुळे तो औरंगाबादेतील घरी आला होता. साहिब आणि त्याचे परिवार हे मूळचे उत्तर प्रदेश मधील आहे. मागील अनेक वर्षांपासून ते औरंगाबादेत वास्तव्यास आहे. त्याच्या वडिलांची चष्म्याची दुकान आहे. भाजपचा मोठा नेता शरद पवारांच्या भेटीला, सुप्रिया सुळेंनी फोटो केला शेअर वडील कामात असल्याने चष्म्याला लागणारी काच आणण्यासाठी तो औरंगपुरा येथील काचेच्या ठोक विक्री दुकानात गेला होता. तेथे इतरही ऑप्टिकल व्यवसायिक आले होते. त्यांच्या बोली भाषेवरून तो यूपीचा असल्याचे साहिबला जाणवले असता तुम्ही यूपी चे आहेत का? असे विचारले असता तिथेच साहिबला मारहाण करण्यात आली. ही बाब वडिलांना माहिती झाल्यावर साहिबचे वडील  त्या तरुणांची समजूत काढण्यासाठी आणि वाद मिटविण्यासाठी परत तेथे गेले असता वडिलांसमोरच 5 ते 6 तरुणांनी लोखंडी रोडने साहिबला बेदम मारहाण केली. मुलीला पळवून लग्न केले म्हणून मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण या मारहाणीत साहिब हा गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याला तरुणांच्या तावडीतून सोडवत वडिलांनी साहिबला सिटीचौक पोलीस ठाण्यात नेले तेथे साहिबला रक्ताच्या उलट्या झाल्या. हे पाहून तातडीने त्यास घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. साहिबच्या अंतर्गत अवयवांना गंभीर इजा झाल्याने त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सध्या त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून साहिबची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेला 24 तास उलटून देखील पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. 'माझा मुलगा कधीपर्यंत रुग्णालयात राहील तो कधी चांगला होईल याची माहीत नाही. माझ्या समोर माझ्या मुलाला फक्त यूपीचा असल्याने एवढी अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,' अशी मागणी साहिबच्या वडिलांनी केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Aurangabad, Crime

    पुढील बातम्या