सुरेश रैनाच्या काकांची हत्या करणाऱ्या आरोपींना अखेर ठोकल्या बेड्या

काकांची हत्या झाल्यानंतर सुरेश रैना UAE मधून IPL सुरू होण्याआधीच मायदेशी परतला होता.

काकांची हत्या झाल्यानंतर सुरेश रैना UAE मधून IPL सुरू होण्याआधीच मायदेशी परतला होता.

  • Share this:
    ipl panjab police 3 people arrested for suresh raina uncle murder case ghनवी दिल्ली, 18 सप्टेंबर : क्रिेकेटर सुरेश रैनाच्या काकांची हत्या आणि दरोडा प्रकरणातील तीन संशयित आरोपींना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. 31 ऑगस्ट रोजी पठाणकोठ येथे ही थरारक घटना घडली होती़ यात रैनाचे काका अशोक कुमार यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या प्रकरणात नियुक्त विशेष तपास समितीने या तीन संशयितांना पठाणकोट रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे. सुरक्षा यंत्रणांनी हे प्रकरण सोडविल्याची माहिती पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिली. सावन अलियास, मॅचिंग महोब्बत आणि शाहरूख खान अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावं असून ते राजस्थानचे रहिवासी आहेत. 31 ऑगस्ट रोजी सुरेश रैनाचे नातेवाईक आणि कंत्राटदार म्हणून कार्यरत असलेल्या अशोक कुमार यांच्या पठाणकोट इथल्या घरी सशस्त्र दरोडा पडला होता. हे वाचा-तरुणाला नग्न करून केली बेदम मारहाण, नंतर चाकूने सपासप वार करून संपवले या प्रकरणी अशोक कुमार यांची हत्या करण्यात आली होती तर त्यांची पत्नी आशा राणी आणि मुलगा कौशल कुमार आणि अन्य तिघे जखमी झाले होते. या पैकी आशा राणी यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेच्या तपासासाठी एक SIT अर्थात विशेष तपास समिती नियुक्त करावी, असे आदेश मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिले होते. या समितीत अमृतसर बॉर्डर रेंजचे आयजीपी, पठाणकोट एसएसपी व धार कलानचे डीएसपी यांचा समावेश होता. घटना घडली त्या दिवशी सकाळी डिफेन्स रोडवर तिघा संशयितांना पहिले गेले होते आणि हे तिघे पठाणकोट रेल्वे स्थानकाजवळ एका झोपडीत वास्तव्यास असल्याची माहिती तपास समितीला 15 सप्टेंबर रोजी मिळाली होती. त्यांनी तातडीने तपास चक्र फिरवून आरोपींकडून सोन्याची साखळी आणि 1530 रुपयांची रोकड यासोबत हल्ल्यादरम्यान वापरण्यात आलेलेलं साहित्य जप्त करण्यात आले होते. हे वाचा-भारतात येण्याआधीच रशियन लशीबाबत मोठी माहिती; दिसून आले SIDE EFFECT दरम्यान, या घटनेच्या काही दिवसांनी सुरेश रैना UAE मधून IPL सुरू होण्याआधीच मायदेशी परतला होता. आपल्या कुटुंबाची सुरक्षा महत्त्वाची आहे. 20 दिवस क्वारंटाइन असल्यानं तो आपल्या नातेवाईकांना भेटू शकला नाही मात्र BCCIनं केलेल्या सहकाऱ्याबाबत रैनानं आभार व्यक्त केले आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: