दिल्लीत इंटरनॅशनल ड्रग्स रॅकेटचा भंडाफोड; सुमारे 1300 कोटींचे ड्रग्स जप्त

दिल्लीत इंटरनॅशनल ड्रग्स रॅकेटचा भंडाफोड; सुमारे 1300 कोटींचे ड्रग्स जप्त

अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासह विविध देशांत ड्रग्सची तस्करी होत होती

  • Share this:

नवी दिल्ली, 15 डिसेंबर: अमली पदार्थ विरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी (एनसीबी) देशाची राजधानी दिल्लीत इंटरनॅशनल ड्रग्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. 9 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 1300 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. आपोपींमध्ये भारतीयांसह विदेशी नागरिकांचा समावेश आहे. पाच भारतीय नागरिकांसह एक अमेरिकन, एक इंडोनेशियन आणि दोन नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. या सर्वांची सध्या कसून चौकशी केली जात आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडासह विविध देशांत ड्रग्सची तस्करी होत होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाने दिल्लीत शुक्रवारी ही धडक कारवाई केली. या टोळीकडून तब्बल 20 किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे. भारतीय बाजारात याची किंमत 100 कोटी रुपये असली तरीही एकूण कारवाईमध्ये 1300 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. देशात एकाचवेळी जप्त करण्यात आलेला कोकेनचा हा सर्वात मोठा साठा असल्याचे सूत्रांनी सांगितले. या टोळीच्या ऑस्ट्रेलियातील सदस्यांकडून आणखी 55 किलो कोकेन आणि 200 किलो मेथेमफिटामाइन (मेथ) जप्त करण्यात आले आहे.

भारतासह जगभरात होते संपर्क या अमली पदार्थ तस्करांच्या टोळीचे दिल्लीसह एनसीआर, पंजाब, उत्तराखंड आणि महाराष्ट्रात सुद्धा संपर्क होते. सोबतच, या टोळीचे सदस्य ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, इंडोनेशिया, श्रीलंका आणि मलेशियासह नायजेरियातील एंजट्सच्या संपर्कात होते. ही टोळी भारतात ड्रग्स आणण्यासह दुसऱ्या देशांना पाठवण्याचेही काम करत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2019 09:19 PM IST

ताज्या बातम्या