Home /News /crime /

घरकामाला बाई ठेवण्यावरुन इंटीरिअर डिजायनर सून भडकली; सर्वांसमोर सासूला मारहाण

घरकामाला बाई ठेवण्यावरुन इंटीरिअर डिजायनर सून भडकली; सर्वांसमोर सासूला मारहाण

सर्वांसमोर ही सुशिक्षित म्हणवणारी सून सासूला शिव्या देत होती, ती इतक्यावरच थांबली नाही. तर तिने सासूला मारहाणही केली.

    गुरुग्राम, 11 सप्टेंबर : हरयाणामधील गुरुग्राममधून (Gurugram) एक सुनेने आपल्या सासूला मारहाण केल्याचं (Beating) वृत्त समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. यादरम्यान घरातील काही सदस्यही उपस्थित असतानाही सुनेने सासूला कानशिलात लगावली. या वादाचं कारण घरात काम करण्यासाठी महिला ठेवण्यावरुन झाल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध सासू (mother-in- Law) बऱाच काळापासून घरातील सर्व काम करीत आहे. त्यामुळे आईला त्रास नको म्हणून पीडित महिलेच्या मुलाने घरात काम करणारी बाई ठेवण्यास सांगितलं. मात्र व्यवसायाने इंटीरियर डिजायनर असलेल्या सुनेला हे मान्य नव्हतं. (interior designer daughter in law beats mother in law in front of everyone for keeping housewife ) हे ही वाचा-घटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान नवरा-बायको पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात सायबर सिटी गुुरुग्राममधील कलयुगातील या सुनेने आपल्या सासूला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कविता जिंदल नावाची महिला पहिल्यांदा आपल्या सासूसाठी अपशब्द वापरले, त्यानंतर तिला मारहाण करू लागले. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा राजेंद्र पार्क पोलीस ठाणे हद्दीतील आहे. येथे डॉक्टर अंशुल मित्तल आपली पत्नी जिंदल आणि आईसोबत राहतात. कविता जिंदल ही व्यवसायाने इंटिरियर डिजायनर आहे. काय आहे वादाचं कारण? घरात काम करण्यासाठी बाई ठेवण्यावरुन वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की सुनेने सासूला मारहाण केली. डॉक्टर अंशुल मित्तल आईला त्रास होऊ नये यासाठी घरात बाई ठेवू इच्छित होते. मात्र सुशिक्षित सुनेला हे मान्य नव्हतं. यावरुन वाद सुरू झाला होता. यातूनच या महिलेने शिव्या देत आपल्या आईच्या वयाच्या महिलेला मारहाण सुरू केली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime, Haryana

    पुढील बातम्या