नवी दिल्ली 06 जुलै: दृश्यम (Drishyam Movie) सिनेमातून प्रेरणा घेऊन (Delhi) एका व्यक्तीने शेजारच्या व्यक्तीला गुन्ह्यात अडकवण्यासाठी स्वतःवर हल्ला करवून घेतला. उत्तर दिल्लीतल्या (North Delhi) मजनू का टिला परिसरात राहणाऱ्या अमरपाल (Amarpal) नावाच्या व्यक्तीचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या ओम्बीर नावाच्या व्यक्तीच्या कुटुंबाशी क्षुल्लक कारणाने वाद होते. अमरपाल आणि ओम्बीर यांच्यात 29 जून रोजी मारामारी झाली आणि त्यात अमरपाल आणि त्याच्यासह असलेल्या काही जणांनी ओम्बीरच्या आईची हत्या केली. या प्रकरणी अमरपालला अटक झाली आणि त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं. त्यानंतर त्याला अंतरिम जामीन (Interim Bail) मिळाला आणि 60 दिवसांसाठी त्याची सुटका झाली.
पॅरोलवर (Parole) बाहेर आलेल्या अमरपालने आपण केलेल्या गुन्ह्याच्या साक्षीदारांवर दबाव आणायला सुरुवात केली. मात्र त्यात आपल्याला यश मिळत नाही हे लक्षात आल्यावर त्याने त्यांना खोट्या प्रकरणात गोवायचं ठरवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नातं हरलं! माशावरुन झालेला वाद टोकाला; भाच्यानं मामासोबत केलं निर्दयी कृत्य
अमरपालने त्याचा भाऊ गुड्डू आणि चुलतभाऊ अनिल यांच्यासह मिळून एक कट रचला. त्याने त्यांना दृश्यम सिनेमा दाखवला आणि त्याच्या कथानकानुसार परिस्थिती तयार करून आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी खोटे साक्षीदार तयार करायचं ठरवलं. त्यानुसार अमरपालने लोकांना सांगायला सुरुवात केली, की ओम्बीरच्या कुटुंबीयांकडून आपल्याला धमकावलं जात आहे. आपल्यावर केला जाणारा हल्ला प्राणघातक ठरू नये, यासाठी त्याने देशी पिस्तूल आणि बुलेट पेलेट्सचीही व्यवस्था केली. अनिलने आपला मेव्हणा मनीष यालाही या कटात सामील करून घेतलं. अनिलने अमरपालवर गोळी झाडायची आणि या हल्ल्यामागे ओम्बीर आणि त्याच्या कुटुंबीयांचा हात असल्याचं अमरपालने पोलिसांना सांगायचं, असं त्यांचं ठरलं.
अमरपाल उत्तर दिल्लीतल्या खैबर पासमध्ये (Khyber Pass) नेहमी जात असे. तेच ठिकाण हल्ल्यासाठी निश्चित करण्यात आलं. तिथे अमरपालला ओळखणाऱ्या अनेक माणसांचा वावर असल्याने त्यांचा या प्रकरणात साक्षीदार म्हणून उपयोग होईल, असा विचार अमरपालने केला होता. या कटानुसार अमरपाल खैबर पासमध्ये गेला. तिथे त्याने तासभर घालवला आणि नंतर कटाची अंमलबजावणी करण्यासाठी त्याने गुड्डूला कॉल करून बोलावलं. त्यानुसार, गुड्डू, अनिल आणि मनीष त्या ठिकाणी पोहोचले.
अर्ध्यावर मोडला संसार; वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल
अनिलने ठरल्याप्रमाणे अमरपालवर गोळी झाडली आणि तो पळून गेला. जखमी स्थितीत अमरपाल त्याच्या मित्राच्या घरी गेला आणि शत्रू आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. दरम्यान, हा सगळा प्लॅन पोलिसांनी उघड केला. गाझियाबादचा रहिवासी असलेल्या 30 वर्षांच्या अनिलला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, गुड्डू आणि मनीषलाही ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Delhi, Murder Mystery