टीव्ही मालिकेतून सुचली आयडिया : तरुणानं केली प्रेयसीच्या मुलाची हत्या

टीव्ही मालिकेतून सुचली आयडिया : तरुणानं केली प्रेयसीच्या मुलाची हत्या

स्वप्नातील महिलेला मिळवण्यासाठी तिच्या 10 वर्षाच्या मुलाची 22 वर्षाच्या तरुणानं हत्या (Murder) केली आहे.टीव्ही मालिका (TV Serial) पाहून त्याने या हत्येचा कट रचला होता.

  • Share this:

दिल्ली, 26 डिसेंबर : स्वप्नातील महिलेला मिळवण्यासाठी तिच्या 10 वर्षाच्या मुलाची 22 वर्षाच्या तरुणानं हत्या (Murder) केली आहे. या तरुणानं मोठ्या चालाखीनं सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. टीव्ही मालिका (TV Serial) पाहून त्याने या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली आहे.

काय आहे प्रकरण?

बिट्टू असं या प्रकरणातील आरोपी तरुणाचं नाव आहे. दक्षिण दिल्लीमधील एका महिलेवर त्याचे प्रेम होते. ती महिला 10 वर्षांच्या मुलासह पतीपासून वेगळी राहत होती. त्या तरुणानं महिलेला लग्नासाठी मागणी देखील घातली होती. त्यावेळी मुलाचं कारण देत महिलेनं तो प्रस्ताव नाकारला होता. महिलेकडून नकार मिळाल्यानंतरही बिट्टूनं तिच्याशी संबंध कायम ठेवले होते. तो तिच्या मुलालाही अनेकदा बाजारात तसंच जवळच्या जंगलात फिरायला घेऊन जात असे.

बिट्टूला 28 नोव्हेंबरला रोजी तो मुलगा घराच्या जवळील किराणा दुकानाजवळ एकटाच दिसला. त्यावेळी त्याने त्याला गोड बोलून बेरी खाण्याच्या निमित्तानं जंगलात नेले. जंगलात बिट्टून गमचानं गळा दाबून मुलाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह जवळच्या चिखलातील तलावात फेकून दिला.

महिलेला तपाससाठी मदत

बिट्टूनं या हत्येनंतर तातडीनं महिलेच्या घरी धाव घेतली. तिला संपूर्ण सहानुभूती दाखवत पोलीस तक्रार दाखल करण्यास मदत केली. तो महिलेसोबत तिच्या मुलाचा तपास करण्याचं नाटक करत होता.

बिट्टू हत्येच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा जंगला गेला. त्यावेळी त्याला तो मृतदेह तलावात सापडला. त्याने तो मृतदेह सुरुवातील जंगलातील दगडांच्या मागे लपवला. त्यानंतर जवळच्या पेट्रोल पंपातून पेट्रोल खरेदी केली आणि तो मृतदेह जाळला. त्याचबरोबर त्यानं कोणताही पुरावा राहू नये म्हणून हत्या करताना घातलेले कपडे देखील एका प्लॅस्टिक बॅगमध्ये घालून जंगलातील तलावात फेकून दिले.

पोलिसांनी अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला आहे. जवळपास महिनाभरानंतर या प्रकरणातील आरोपी बिट्टूला अटक केली आहे. त्यानं हत्येची कबुली दिली असून टिव्ही मालिका पाहून ही हत्या केली आणि त्यानंतर पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला असं बिट्टूनं त्याच्या जबाबात सांगितले आहे.

Published by: News18 Desk
First published: December 26, 2020, 9:19 AM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या