निवडणुकीच्या वादातून 3 वर्षाच्या मुलाला केलं टार्गेट? एअर गनने गोळी मारून केली हत्या

निवडणुकीच्या वादातून 3 वर्षाच्या मुलाला केलं टार्गेट? एअर गनने गोळी मारून केली हत्या

Murder in Kanpur: 3 वर्षांच्या एका निष्पाप मुलाची (3 year old innocent boy) एअर गनने गोळी मारून हत्या (Murder by air gun shot) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

कानपूर, 17 एप्रिल: 3 वर्षांच्या एका चिमुकल्याची (3 year old innocent boy) एअर गनने गोळी मारून हत्या (Murder by air gun shot) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा आरोप मृत मुलाच्या नातेवाईकांनी लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. फरार आरोपी हा गावच्या माजी प्रमुखाचा पुतण्या आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरजवळील एका गावात ही घटन घडली आहे. महाराजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महोली हे गाव शुक्रवारी या चिमुकल्याच्या हत्येनं हादरलं. मृत मुलाच्या वडिलांच नाव प्रभात सिंह असून ते नौबस्ता याठिकाणचे रहिवासी आहेत. त्यांची पत्नी त्यांचा तीन वर्षांचा मुलगा युवराज याला घेऊन माहेरी गेली होती. शुक्रवारी सायंकाळी गावचा माजी प्रमुख शिव बहादूर सिंहचा पुतण्या चंदन तीन वर्षांच्या युवराजला आपल्या घरी घेऊन गेला.

नातेवाईकांनी असा आरोप लावला की, चंदन सुरुवातीला युवराजसोबत काही वेळ खेळला. त्यानंतर त्याने अचानक एअर गनमधून चिमुकल्याच्या छातीवर गोळी झाडली. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीनं मुलाला रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात पोहचल्यानंतर डॉक्टरांनी चिमुकल्याला मृत घोषित केलं.

हे ही वाचा- बुलडाण्यात गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला महिला एसटी वाहकाचा मृतदेह; घातपाताचा संशय

मृत मुलाचे वडील प्रभात यांनी सांगितलं की, युवराज हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांचे मामा अरविंद सिंह हे सैन्यातील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांची गावच्या माजी प्रमुखासोबत निवडणुकीसाठी स्पर्धा सुरू आहे. निवडणुकीतील वैरामुळे त्याचा पुतण्या चंदनने युवराजवर एअर गनने गोळी झाडली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक्षक आदित्य शुक्ला यांनी सांगितलं की, मृत मुला वडिलांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांचं पथक आरोपीला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. या घटनेचा तपास झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहितीही शुक्ला यांनी दिली आहे.

Published by: News18 Desk
First published: April 17, 2021, 2:05 PM IST

ताज्या बातम्या