• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • 50 हजारांसाठी वृद्ध पित्याचा अमानुष छळ; विष पाजून तारेनं गळा आवळला, महाराष्ट्रातील लज्जास्पद घटना

50 हजारांसाठी वृद्ध पित्याचा अमानुष छळ; विष पाजून तारेनं गळा आवळला, महाराष्ट्रातील लज्जास्पद घटना

Crime in Beed: बीड जिल्ह्यातील एका वयोवृद्ध पित्याचा 50 हजार रुपयांसाठी अमानुष छळ (Inhuman torture) करण्यात आला आहे. येथील एका युवकानं आपल्या पत्नीच्या आणि मुलाच्या मदतीनं 85 वर्षीय पित्याला जबरदस्तीनं पकडून विष पाजलं (Father poisoned forcibly) आहे.

 • Share this:
  बीड, 09 मे: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात 50 हजार रुपयांसाठी एका वयोवृद्ध पित्याचा अमानुष छळ (Inhuman torture) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका युवकानं आपल्या पत्नीच्या आणि मुलाच्या मदतीनं आपल्या 85 वर्षीय पित्याला जबरदस्तीनं पकडून विष पाजलं (Father poisoned forcibly) आहे. आरोपी मुलगा एवढ्यावरचं थांबला नाही, तर त्याने तारेच्या साह्याने पित्याचा गळा आवळला आणि घरात धूर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. पण घरातून येणारा धूर पाहून गावातील काही लोकांनी घराकडे धाव घेतल्यानं संबंधित पित्याचा जीव वाचवला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. संबंधित 85 वर्षीय पीडित वयोवृद्ध व्यक्तीचं नाव काशिनाथ वाल्हू मिसाळ असून ते आपल्या कुटुंबीयांसोबत आष्टी तालुक्यातील पेठपांगरा या ठिकाणी शेतात वास्तव्याला आहेत. दरम्यान 20 एप्रिल रोजी आरोपी मुलानं आपल्या पित्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. यावेळी पित्यानं मुलाला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. याच रागातून चिडलेला मुलगा भिवसेन याने आपली पत्नी कांताबाई आणि मुलगा सोमीनाथ यांच्या मदतीनं पित्याला जबरदस्तीनं विष पाजलं. आरोपी एवढ्यावरचं थांबले नाहीत, तर त्यांनी तारेच्या साह्याने या वयोवृद्ध बापाचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी घरातील जुन्या पिशव्या जाळून धूर केला आणि वयोवृद्ध पित्याला घरात कोंडलं. पण घरातून धूर निघत असल्याचं पाहून गावातील काही लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी पीडित व्यक्तीचा मुलगा भिवसेन याला फोन करून बोलावून घेतलं आणि पीडित काशीनाथ यांना शेवगाव येथील रुग्णालयात दाखल केलं. हे ही वाचा-आधी विष नंतर करंट देत काढला पतीचा काटा; डॉ. नीरज पाठक मर्डर केसचा उलगडा वृद्धावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी शुक्रवारी अंमळनेर पोलिसांना जबाब दिला आहे. याप्रकरणी अंमळनेर पोलिसांनी आरोपी मुलगा भिवसेन, सून कांताबाई आणि नातू सोमीनाथ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपी सध्या फरार असून अंमळनेर पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
  Published by:News18 Desk
  First published: