धक्कादायक! कॅमेऱ्यात कैद झाला गळा आवळून हत्या केल्याचा LIVE VIDEO

धक्कादायक! कॅमेऱ्यात कैद झाला गळा आवळून हत्या केल्याचा LIVE VIDEO

आधी महिलेचा गळा आवळला, मग डोक्यात घातला दगड; CCTVमध्ये मर्डर थरार कैद.

  • Share this:

इंदूर, 09 ऑक्टोबर : मध्य प्रदेशातील सर्वात मोठं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. इंदूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशाच एका निर्घृण हत्येचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये फूटपाथवर झोपलेल्या एका महिलेची हत्या करताना एक तरुण दिसत आहे. आरोपीनं दोरी व दगडांच्या सहाय्याने फूटपाथवर झोपलेल्या महिलेची हत्या केली. हा व्हिडीओ कधीचा आहे, याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही आहे. मात्र रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये ही हत्या कैद झाल्यामुळे पोलिसांना आरोपीचा शोध घेण्याच सोपे जाईल. सध्या पोलीस या आरोपीचा शोध घेत असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा-मंदिराबाहेर पुजाऱ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं; गावकऱ्यांचा विरोध करणं जीवावर

वाचा-घरात वाहत होता रक्ताचा पाट; आई, वहिनी, भाचीला सुऱ्याने भोसकलं नंतर स्वत:च्याच...

हा व्हिडीओ इंदूरच्या संयोगितागंज पोलीस स्टेशन परिसरातील बीडी चेंबर जवळचा आहे. इथं एक 45 वर्षीय महिला फूटपाथवर झोपली होती. त्याचवेळी हल्लेखोर तिथं आला आणि त्यानं महिलेची निर्घृणपणे हत्या केली.

वाचा-15 वर्षांच्या गर्भवती मुलीचं धडापासून वेगळं केलं शीर, वडील-भावाने रचला डाव

ही संपूर्ण घटना रस्त्या जवळ असलेल्या इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या महिलेच्या हत्येचा तपास करणार्‍या महिला पोलीस अधिकारी यांनी मृत महिलेच्या वैद्यकीय रिपोर्टच्या आधारे पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले.

Published by: Priyanka Gawde
First published: October 9, 2020, 3:29 PM IST
Tags: crime

ताज्या बातम्या