मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नेता- अभिनेता नाही; 'हा' आहे वाहन चोर...तरी रस्त्यावर लागले होर्डिंग्स, हे आहे त्यामागचं कारण

नेता- अभिनेता नाही; 'हा' आहे वाहन चोर...तरी रस्त्यावर लागले होर्डिंग्स, हे आहे त्यामागचं कारण

indore

indore

आत्तापर्यंत आपण केवळ सेलिब्रिटी किंवा नेत्यांचीच होर्डिंग्ज (hoardings) आपण रस्त्याच्या दुतर्फा पाहिली आहेत. मात्र, मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये (Indore Crime Control)अजब गोष्ट पाहायला मिळाली. तेथे मोठे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. मात्र, त्यावर कोणी नेता अभिनेत्याचे फोटो नसून कुख्यात वाहन चोरांचे फोटो झळकावले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

इंदूर, 9 फेब्रुवारी : आत्तापर्यंत आपण केवळ सेलिब्रिटी किंवा नेत्यांचीच होर्डिंग्ज (hoardings) आपण रस्त्याच्या दुतर्फा पाहिली आहेत. मात्र, मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये (Indore Crime Control)अजब गोष्ट पाहायला मिळाली. तेथे मोठे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. मात्र, त्यावर कोणी नेता अभिनेत्याचे फोटो नसून कुख्यात वाहन चोरांचे फोटो झळकावले आहेत.

वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी इंदूर पोलिस रस्त्यावर उतरले आहेत. आता चौकाचौकात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची पोस्टर्स लावली जात आहेत. माहिती दिल्यास बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी आयुक्तालय यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे.

वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी इंदूर पोलिसांनी नामी शक्कल लढवली आहे. त्याची सुरुवात प्रथम विजय नगर पोलिस ठाण्याच्या बाजूने करण्यात आली. विजय नगर चौकात पोलिसांनी 12 वाहन चोरांचे मोठे पोस्टर, होर्डिंग्ज लावले आहेत.

विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपींनी 23 दिवसांत 56 हून अधिक दुचाकी चोरल्या आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून वाहन चोरांची ओळख पटवली आणि चौकात पोस्टर लावले. पोस्टरमध्ये पोलिसांनी आरोपींची माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळखही गोपनीय ठेवण्यात येणार आहे. पोस्टरमध्ये विजय नगर पोलिस स्टेशन आणि स्टेशन प्रभारी यांचा क्रमांकही देण्यात आला आहे.

येत्या काही दिवसांत यादीती काही कुख्यात गुंडांचे पोस्टर चौकाचौकात लावले जातील. खून, दरोडा, ब्लॅकमेलिंग, बलात्कार, चाकू तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी, अवैध वसुली अशा अनेक गंभीर गुन्ह्यांतील आरोपींची आता खैर नाही. लवकरच प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीबाहेर असलेल्या चोरट्यांची माहिती चौकाचौकात सार्वजनिक केली जाईल. फरार आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी फोटो शहरात लावण्याचेही नियोजन असल्याचे पोलिस आयुक्त हरिनारायण चारी मिश्रा यांनी म्हटले आहे.

पोलीस आयुक्त हरिनारायण चारी मिश्रा यांच्या सूचनेवरून शहरातील गुन्हे रोखण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबण्यात आली आहे. शहरातील चौकाचौकात चोरट्यांची होर्डिंग्ज लावण्यात आलेली इंदूरमधील ही पहिलीच घटना आहे, कोणत्याही राजकारणी किंवा अभिनेत्याचे नाही.

गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांची मोहीम सुरूच आहे. मोठ्या शहरांमध्ये वाहनचोरी आणि गुन्हेगारी हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. अनेक प्रकरणांमध्ये स्थानिक गुन्हेगारांबरोबरच बाहेरील गुन्हेगारांचाही सहभाग असतो. हे पाहता पोलिसांनीही सर्वसामान्यांना जागरूक करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या आहेत.

First published:

Tags: Crime news, Indore, Indore News, Madhya pradesh