Home /News /crime /

न्यूड डान्स, गँगरेप, सिगरेटने प्राइवेट पार्टला चटके; आता विदेशी मुलींसाठी वेडा, पत्नीला टॉर्चर करणाऱ्या बिल्डरचा नवा खुलासा

न्यूड डान्स, गँगरेप, सिगरेटने प्राइवेट पार्टला चटके; आता विदेशी मुलींसाठी वेडा, पत्नीला टॉर्चर करणाऱ्या बिल्डरचा नवा खुलासा

छत्तीसगडच्या युवतीवर इंदूरमधल्या एका फार्म हाउसवर अत्याचार करणारा राजेश विश्वकर्मा (Rajesh Vishwakarma) नावाचा नराधम सेक्स ॲडिक्ट (Sex Addict) असल्याचं तपासातून समोर आलं आहे.

इंदूर, 22 जानेवारी: छत्तीसगडच्या युवतीवर इंदूरमधल्या एका फार्म हाउसवर अत्याचार करणारा राजेश विश्वकर्मा (Rajesh Vishwakarma) नावाचा नराधम सेक्स ॲडिक्ट (Sex Addict) असल्याचं तपासातून समोर आलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची एकेक गुपितं उघड होत आहेत. तो खासकरून परदेशी तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवायचा. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्याच्या लॅपटॉपमधूनही आता बरीच माहिती उघडकीस येत आहे. अनेक ठिकाणच्या सेक्स रॅकेटशी त्याचा संबंध असल्याचंही पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. परदेशी कॉल गर्ल्सना बोलावण्यासाठी तो आपल्या मित्रांकरवी तिकिटं काढायचा, महागड्या हॉटेलात जायचा. पोलिसांच्या तपासात अजूनही काही गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. आरोपीच्या विरोधातले काही ठोस पुरावे सामूहिक बलात्कारामधल्या (Indore Gang rape) दुसऱ्या आरोपीने नष्ट केले असल्याची माहिती मिळत आहे. दुसरा आरोपी विवेक आयटी एक्सपर्ट आहे. त्याने आपला मित्र असलेल्या राजेशला मदत करण्यासाठी पुरावे नष्ट केले आहेत. तथापि पोलिसांनी आयटी एक्स्पर्ट्सकडून काही महत्त्वाची माहिती मिळवली आहे. त्यातही काही डेटा अजून रिकव्हर व्हायचा आहे. तो झाल्यावरच बाकीच्या गोष्टी उघड होतील आणि आरोपीविरोधातील पुरावे समोर येण्याची शक्यता आहे. हे वाचा-'तीस-तीस' घोटाळ्याच्या मास्टरमाईंडला औरंगाबादमध्ये बेड्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जास्तीत जास्त परदेशी मुलींशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न राजेश करायचा. त्याला परदेशी तरुणींचं प्रचंड वेड होतं. याशिवाय त्याला पॉर्न चित्रपट बघण्याचंही वेड होतं. अनेकदा तो अश्लील चित्रपट बघून त्यातल्या पद्धतीने तरुणींशी संबंध ठेवायचा. राजेशच्या अत्याचाराला बळी पडलेली छत्तीसगडमधली (Chhattisgarh) पीडित तरुणी आणि राजेशच्या पत्नीनेही राजेशच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. राजेश अनैसर्गिकरीत्या शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्यांचा छळ करत असल्याचं या दोघींनीही तक्रारीत म्हटलं होतं. तो पॉर्न मूव्ही सुरू करून पत्नीला न्यूड डान्स करण्यास भाग पाडत असे. तसंच, त्यात दाखवलेल्या पद्धतीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठीही जबरदस्ती करत असे.

हे वाचा - पत्नीचं शोषण करणाऱ्या बिल्डरची डर्टी कहाणी; फार्म हाऊसमध्ये बार-सेक्स टॉय, न्यूड पार्टीही!

अनेक शहरांमध्ये सेक्स रॅकेट (Sex Racket) चालवणाऱ्या टोळीशी आरोपी राजेशचा थेट संबंध असल्याचीही माहिती समोर येत आहे. तिथे येणाऱ्या परदेशी युवतींशी संबंध ठेवण्यासाठी अनेकदा हॉटेलच्या खोल्या बुक करण्यात येत असत. परदेशी कॉल गर्ल्सशी संपर्क साधायला त्याचा मित्रच त्याला मदत करत असे. तोच त्यांना तिकीट काढून देई. अनेकदा या परदेशी सेक्स वर्कर्स राजेशच्या फार्म हाउसवर राहायच्या. याशिवाय राजेश गोवा आणि जयपूर येथे वारंवार जायचा आणि अर्थातच अशी कृत्यं करण्यासाठीच त्याचे हे दौरे असायचे. हे वाचा-महिला वकिलासोबत ATMमध्ये तरुणाचं विकृत कृत्य; नंतर हातातील पैसे घेऊन काढला पळ राजेशला घाबरून त्याची पत्नी तिच्या माहेरी निघून गेली तेव्हा त्याने तिला आणि तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. एवढंच नाही तर, त्यांना मारण्यासाठी गुंडदेखील पाठवले होते. यानंतर मात्र त्याच्या पत्नीने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी उघड होत आहेत. आता 31 जानेवारीपर्यंत राजेशसह अन्य 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे.
First published:

Tags: Indore, Indore News

पुढील बातम्या