भोपाळ, 28 नोव्हेंबर : इंदूरमधून (Indore News) एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सहा वर्षांच्या एका मुलाने आईची नक्कल केल्यानंतर असं काही घडलं की, तुम्ही विश्वासही करू शकणार (Shocking News) नाही. या घटनेनंतर मुलाच्या आईला मोठा धक्का बसला आहे. 6 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूचं दु:ख पचवणं या माऊलीसाठी कठीण जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 6 वर्षांच्या मुलाने आईची नक्कल करीत गॅसवर ठेवलेलं उकळत्या दुधावर पाइपने फूंकर मारली. मात्र श्वास आत घेताना उकळतं दूध त्याच्या श्वसननलिकेतही गेलं आणि मुलाचा मृत्यू झाला. ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली आहे. रविवारी उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. (indore A 6 year old boy dies after being blown into boiling milk)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 23 नोव्हेंबरच्या सायंकाळी फिनिक्स टाऊनशीप येथील आहे. मुलाचे वडील रामजी प्रसाद यांनी सांगितलं की, हा प्रकार घडला तेव्हा ते कामावर गेले होते. घरात पत्नी रंजू देवी, सहा वर्षांचा मुलगा संजीव कुमार आणि अडीच वर्षांची मुलगी स्वीटी होते. सायंकाळी पत्नी स्वयंपाक घरात जेवण करीत होती. तिने दूध गरम होण्यासाठी गॅसवर ठेवलं. आणि ती दुसऱ्या कामात गुंतली.
हे ही वाचा-VIDEO : रस्त्यावरुन चालताना वयस्क व्यक्तीकडून झाली छोटीशी चूक; तरुणाकडून मारहाण
यादरम्यान मुलगा संजीवने पाहिलं की दूध उकळत आहे. त्याने त्याने स्टूल घेतला आणि तो गॅसपर्यंत पोहोचला. त्याने प्लास्टिकच्या पाईपने पातेल्यात फुंकर मारली. दूधाची उकळी खाली स्थिरावली, मात्र यादरम्यान मुलाने जोरात श्वास आत घेतला. दुधाच्या पातेल्यात असलेल्या पाईपमधून काही दूध त्याच्या तोंडात गेलं. यामुळे त्याच्या अंतर्गत अवयवांवर परिणाम झाला. यानंतर त्याला तत्काळ अरबिंदो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तीन दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी शनिवारी त्याचं पोस्टमार्टम केलं. मुलाचे वडील रामजी प्रसाद यांनी सांगितलं की, संजीव नेहमी त्याच्या आईला उकळत्या दुधावर फुंकर घालताना पाहत होता. त्यानेही तसच करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पाईपची मदत घेतली. फुंकल्यानंतर त्याने श्वास आत घेतला. यामुळे गरम दूध त्याच्या श्वसननलिकेत गेली आणि त्यांच्या अंतर्गत अवयावंचं नुकसान झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indore News, Shocking news